Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या जन्माच्या दहा दिवसातच कामावर परतली नेहा धूपिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 13:32 IST

नेहा धूपियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नेहा कामावर परतली आहे. गत १८ नोव्हेंबरला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने आपल्या मुलीचे नाव मेहर असे ठेवले आहे.

ठळक मुद्देयाचवर्षी १० मे रोजी नेहाने अंगद बेदीशी लग्न केले. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती.

नेहा धूपियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नेहा कामावर परतली आहे. गत १८ नोव्हेंबरला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने आपल्या मुलीचे नाव मेहर असे ठेवले आहे. मेहरचा जन्म होऊन उणेपुरे दहा-बारा दिवस होत नाही तोच नेहा कामावर परतली आहे. खुद्द नेहाने ही माहिती दिली आहे. नेहाने आपल्या सोशल अकाऊंटवर एक पोस्ट व सेल्फी शेअर केला आहे. आरशासमोर बसून हा सेल्फी काढला गेला आहे. या फोटोत नेहा आपल्या हेअरस्टाईलिस्टच्या मदतीने हेअर स्टाईल करतेय.  

याचवर्षी १० मे रोजी नेहाने अंगद बेदीशी लग्न केले. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. अंगद व नेहाने इतके महिने प्रेग्नंसी का लपवली, हे कळायला मार्ग नव्हता. पण  एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वत: यामागचे कारण सांगितले होते.  

सुरूवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर मला काम देणे बंद तर करणार नाही, अशीही भीती मला होती. एक चांगली गोष्ट म्हणजे, सुरूवातीच्या सहा महिन्यांपर्यंत माझे बेबी बम्प दिसले नाही. याचा मला फायदा झाला. माझी एनर्जी लेवल खूप चांगली आहे. मी यादरम्यान ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल्ड बाय नेहा’चे शूटींग संपवले,असे तिने सांगितले होते.

टॅग्स :नेहा धुपिया