‘नीरजा’ महाराष्ट्रात टॅक्स फ्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 01:40 IST
बॉलिवूडस्टार सोनम कपूर अभिनित ‘नीरजा’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला आहे. नीरजा भानोत या शूर फ्लाईट अटेंडंटने स्वत:चा बळी ...
‘नीरजा’ महाराष्ट्रात टॅक्स फ्री
बॉलिवूडस्टार सोनम कपूर अभिनित ‘नीरजा’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला आहे. नीरजा भानोत या शूर फ्लाईट अटेंडंटने स्वत:चा बळी देत पॅनअॅम विमानातून हवाई प्रवाशांची केलेली सुटका, असा चित्रपटाचा विषय आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत एका २३ वर्षीय तरुणीने दिलेली लढ्याची माहिती मिळू शकेल, यासाठी खासदार पूनम महाजन यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रयत्नांना साथ दिली,अशी माहिती चित्रपटाचे निर्माते विजयसिंग यांनी दिली. गेल्या आठवडाभरात या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे.