Join us

नीरजाची आई म्हणते,‘माझी ‘लाडो’ होती जास्त सुंदर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 21:09 IST

सोनम कपूर तिचा आगामी चित्रपट ‘नीरजा’ मध्ये एअरहॉस्टेस नीरजा भनोत हिची भूमिका साकारत आहे. नीरजा भनोत जिने स्वत:चा जीव धोक्यात घालून फ्लाईट क्र मांक ७३ मधील अनेक प्रवाशांचे जीव वाचवले. 

सोनम कपूर तिचा आगामी चित्रपट ‘नीरजा’ मध्ये एअरहॉस्टेस नीरजा भनोत हिची भूमिका साकारत आहे. नीरजा भनोत जिने स्वत:चा जीव धोक्यात घालून फ्लाईट क्रमांक ७३ मधील अनेक प्रवाशांचे जीव वाचवले. तिच्या भूमिकेला जास्त विश्वासार्हता येण्यासाठी ‘प्रेम रतन धन पायो’ फेम अभिनेत्री सोनम कपूर नीरजा भनोतच्या कुटुंबियांना भेटली. रमा भनोत (नीरजाची आई) म्हणाली,‘ सोनमने मला माझ्या ‘लाडो’ नीरजाची आठवण करून दिली. कुठल्याही आईसाठी तिचे मुल हे सर्वांत सुंदर असते. त्याचप्रमाणे ती म्हणते,‘ माझी ‘लाडो’ ही सोनमपेक्षाही जास्त सुंदर होती. ’ यानंतर सोनम म्हणाली,‘ नीरजाची भूमिका करण्याअगोदर ती खुप जास्त दबावाखाली होती.’ रमा भनोतची भूमिका चित्रपटात शबाना आझमी हिने केली आहे. source : www.indialitz.com