Join us

नीरजाचे अशोकचक्र म्हणजे प्रेरणेचा स्त्रोत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:58 IST

एअरहॉस्टेस नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘नीरजा’ चित्रपट नुकताच रिलीज झाला. बॉक्सआॅफीसवर सध्या चित्रपट अत्यंत धूम करतोय. काही ...

एअरहॉस्टेस नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘नीरजा’ चित्रपट नुकताच रिलीज झाला. बॉक्सआॅफीसवर सध्या चित्रपट अत्यंत धूम करतोय. काही राज्यात तर टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. यात नीरजाचा सोनम कपूरने केलेला अभिनय आणि शबाना आझमी यांचा अभिनय अत्यंत कौतुकास्पद होता. फ्लाईड ७३ मधील शेकडो प्रवाशांचे प्राण नीरजाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाचवले. नीरजा भनोत हिला गव्हर्नमेंट आॅफ इंडियातर्फे अशोक चक्र प्रदान करण्यात आले होते. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिने अनेकांचे प्राण वाचवण्यात शूरता दाखवली. खरंतर, तिला मिळालेले अशोक चक्राचे प्रमाणपत्र हा एक  प्रेरणेचा स्त्रोत आहे. तिचे कुटुंबीय तिच्यावर चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे हे पाहून अत्यंत खुश झाले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर नीरजाचा भाऊ अखिल भनोत चित्रपटाला ‘प्रामाणिक आणि प्रेरणादायी’ असे संबोधतो.