Join us

नीरज काबी व शेफाली शाह वन्स अगेन’! पाहा, दमदार ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:54 IST

वन्स अगेन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर इतका अप्रतिम आहे की, चित्रपटाची प्रतीक्षा करणेही जीवावर येईल.

काही चित्रपट ब्लॉकबस्टर असतात, काही मनोरंजक आणि काही चित्रपट कायम मनाच्या कप्प्यात जिवंत राहतात. या यादीत लंचबॉक्स, अक्टूबर, हैदर, मकबूल, शिप आॅफ थीसियस, शाहिद अशा अनेक चित्रपटांचे नाव घेता येईल. असाच आणखी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘वन्स अगेन’. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

 हा ट्रेलर इतका अप्रतिम आहे की, चित्रपटाची प्रतीक्षा करणेही जीवावर येईल. कुठलाही भडकपणा नसलेला, कुठलेही आयटम सॉन्ग नसलेला हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटात एक अभिनेता आणि एका सामान्य हॉटेलची शेफ तारा यांची प्रेमकथा दाखवली जाणार आहे. दोघांचेही मुले लग्नाला आली असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि हे नाते पुढे कसे न्यायचे, असा प्रश्न त्यांना पडतो. अभिनेता नीरज काबी आणि अभिनेत्री शेफाली शाह यात लीड रोलमध्ये आहेत. त्यांची जबरदस्त केमिस्ट्रीही पाहण्यासारखी आहे. दिग्दर्शक कंवल शेठी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. नीरज काबी आणि शेफाली शाह यांच्याशिवाय रसिका दुग्गल आणि प्रियांशू पैन्यूली या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

 नीरज अलीकडे ‘सेक्रेड गेम्स’मध्ये दिसला होता. शिप आॅफ थीसियस या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते.