Join us  

ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा शक्ती मोहनच्या प्रेमात? dance plus 6 च्या सेटवरच केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 6:42 PM

Neeraj chopra:लाखो तरुणींचा क्रश असलेला नीरज मात्र एका वेगळ्याच सेलिब्रिटीच्या प्रेमात पडला आहे. 

ठळक मुद्देटोकियो ऑलिम्पिक जिंकल्यानंतर नीरजच्या फॅनफॉलोअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokyo Olympic Indian start) सुवर्ण कामगिरी करत देशाला गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे दरवेळी खेळामुळे चर्चेत येणार नीरज यावेळी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत येत आहे. टोकियो ऑलिम्पिक जिंकल्यानंतर नीरजच्या फॅनफॉलोअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. यात तरुणींच्या गळ्यातला तो जणू ताईत झाला आहे. परंतु, लाखो तरुणींचा क्रश असलेला नीरज मात्र एका वेगळ्याच सेलिब्रिटीच्या प्रेमात पडला आहे. 

अलिकडेच नीरज स्टार प्लसवरच्या dance Plus या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. विशेष म्हणजे या शोमध्ये आल्यानंतर त्याचं चक्क शोच्या परिक्षकांवर मन जडलं आणि त्याने जाहीरपणे त्या परीक्षकांना प्रपोज केल्याचं सांगण्यात येतं. सध्या या शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 Bigg Boss Marathi 3: 'ज्यावेळी मी या घरातून बाहेर पडेल..'; शिवलीलाचा निर्धार पाहून चाहते अवाक्

dance Plus मधील परीक्षक आणि प्रसिद्ध डान्सर शक्ती मोहनलाच नीरजने प्रपोज केलं आहे. राघवने मजेशीर अंदाजात प्रपोज केल्यानंतर योग्य पद्धतीने प्रपोज कसं करावं हे एकदा राघवला दाखवा, असं म्हणत शक्तीनेच नीरजा प्रपोज करण्यास सांगितलं. त्यामुळे शक्तीच्या सांगण्यावरुन नीरजने तिला प्रपोज केलं.

दरम्यान, नीरजने शक्तीला प्रपोज केल्यानंतर राघवने मात्र त्याचा प्रचंड त्रास दिल्याचं पाहायला मिळालं. ' भाई आपने गलत जगाह भाला फेंका, असं राघव नीरजला म्हणाला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाल्याचं पाहायला मिळालं. 

टॅग्स :नीरज चोप्राशक्ती मोहनटिव्ही कलाकार