Join us  

'फालतू फेमिनिझम' विधानावर नीना गुप्तांनी सोडलं मौन, सोशल मीडियावरच फोडलं खापर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 2:14 PM

आधी विधान केलं आणि आता सोशल मीडियालाच दिला दोष

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी काही दिवसांपूर्वीच 'फेमिनिझम' फालतू मुद्दा असल्याचं विधान केलं होतं. तसंच पुरष जोवर मूल जन्माला घालू शकत नाहीत तोवर स्त्री-पुरुष समानता होणार नाही असंही त्या म्हणाल्या होत्या. नीना गुप्ता यांच्या फेमिनिझमवरील मुद्दयावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या तसंच त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता या वादावर त्यांनी मौन सोडलं आहे. 

फालतू फेमिनिझम वादावर नीना गुप्ता म्हणाल्या, 'माझं वक्तव्य वाद पसरवण्यासाठी वापरलं गेलं आहे. केवळ फालतू फेमिनिझमचं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं आहे. तेवढंच ऐकून लोक आपापसात वाद घालत आहेत. कोणी माझं समर्थन करतंय तर कोणी माझ्यावर टीका करतंय. पण माझे चाहते पूर्ण मुलाखत पाहा असा सल्ला देत आहेत.'

त्या पुढे म्हणाल्या, 'असं नाही की चुका होत नाहीत. माझ्याकडूनही अनेकदा चुका होतात. पण असे काही लोक आहेत जे काही विचार न करताच सोशल मीडियावर सल्ले देत सुटलेत. मी जर रागात आहे किंवा माझं कोणासोबत भांडण झालं आहे तर मी सोशल मीडियावर काहीच पोस्ट करत नाही. मी सर्वांना हाच सल्ला देते की जर तुम्ही नशेत असाल तर तुम्ही काहीच पोस्ट केले नाही पाहिजे. जर तुम्ही पोस्ट केलंत तर नंतर तुम्हाला पश्चात्ताप होतो. सोशल मीडिया किंला मुलाखतींमध्ये विचारपूर्वक उत्तर दिलं पाहिजे कारण बरेच लोक तुम्हाला ऐकत असतात.'

नीना गुप्ता नुकत्याच 'चार्ली चोपडा' वेबसिरीजममध्ये दिसल्या. तसंच त्यांनी 'लस्ट स्टोरीज 2' मध्येही महत्वाची भूमिका साकारली. त्यांचे मुक्त विचार नेहमीच चर्चेचा विषय असतात.

टॅग्स :नीना गुप्तासोशल मीडियाबॉलिवूड