Join us  

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'मंटो' चा अफलातून ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:13 PM

'मंटो' लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित सिनेमा असून या सिनेमाची गेल्या महिन्यांपासून चांगलीच चर्चा रंगली होती. 

मुंबई : अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि नवाझुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेल्या 'मंटो' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. 'मंटो' लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित सिनेमा असून या सिनेमाची गेल्या महिन्यांपासून चांगलीच चर्चा रंगली होती. 

नवाजुद्दीन सिद्दीकी याने नेहमीप्रमाणे कमाल अदाकारी केल्याचं या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं. तसच भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि देशाची फाळणी हेही या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमात नवाजुद्दीनच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गलने साकारली आहे. त्यासोबतच परेश रावल, ऋषी कपूर, ताहिर राज यांच्यासह अनेक कलाकार यात बघायला मिळणार आहेत. येत्या २१ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

कोण होते मंटो?

सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्र्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतरही साहित्य लिहिले. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूडनंदिता दास