अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नव्या नवेली ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताची मोठी मुलगी आहे. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नव्याने अलीकडे आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. नव्या नंदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी कुटुंबियांसह आणि मित्रांसह एन्जॉय करतानाचे फोटोंमुळे चर्चेत असते.अलीकडेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
फोटो पाहून असे दिसते की, नव्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली आहे आणि जेवणाचा आस्वाद घेते आहे. नेहमीप्रमाणे, यावेळी ती जबरदस्त आकर्षक दिसते आहे. नव्याच्या फोटोवर मिजानने केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. वाह,मी विचार करतो आहे फोटो कुणी क्लिक केला. यासोबतच त्याने हार्टवाली
गेल्या काही दिवसांपासून नव्या आणि मिजानच्या रिलेशनशीपची चर्चा आहे. नव्याबरोबरच्या नात्यातील चर्चेच्या दरम्यान मिजानने झूमला दिलेल्या मुलाखतीत यावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. या मुलाखतीत मिझानला विचारले गेले होते की सारा अली खान, नव्या नवेली नंदा आणि अनन्या पांडे यांच्यापैकी लग्न करण्यासाठी कोणाला निवडशील ? मिझाननेही "मला नव्याबरोबर लग्न करायला आवडेल असे सांगितले.