Decorated officer.Devoted family man.Defending his honour.His name? RUSTOM.Know his story on 12 Aug #RustomFirstLookpic.twitter.com/0LAoZNl82X— Akshay Kumar (@akshaykumar) February 25, 2016
‘रूस्तुम’ मध्ये अक्षय बनलाय नेव्ही आॅफीसर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 21:16 IST
‘वुमेन लव्ह मेन इन युनिफॉर्म...’ आणि बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार जर नेव्ही आॅफीसरच्या युनिफॉर्ममध्ये असेल तर मग क्या बात ...
‘रूस्तुम’ मध्ये अक्षय बनलाय नेव्ही आॅफीसर...
‘वुमेन लव्ह मेन इन युनिफॉर्म...’ आणि बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार जर नेव्ही आॅफीसरच्या युनिफॉर्ममध्ये असेल तर मग क्या बात है...असेच तोंडून बाहेर पडते. त्याच्या आगामी चित्रपट ‘रूस्तुम’ मध्ये त्याने रूस्तुम पवरी यांची पारसी भूमिका केली आहे. दिग्दर्शक टिनु सुरेश देसाई यांचा ‘रूस्तुम’ एक रोमँटिक थ्रिलर आहे. भारतीय समाजात पारसी बांधवांचे खुप योगदान आहे. अक्षय म्हणतो,‘ भारतीय समाज ज्यांचा वर्षानुवर्षे ऋ णी राहणार आहे त्या समाजातील एकाची भूमिका मला करायला मिळते आहे याचा मला आनंद आहे. पारसी समाज अत्यंत शांतताप्रिय असून त्यांनी कधीही आरक्षणाची मागणी केली नाही. देशातील लोकसंख्येच्या केवळ ०.१ टक्के एवढीच त्यांची लोकसंख्या असूनही त्यांना कधीही कुठल्याच समाजाकडून त्रास झाला नाही. ते कधीच सरकारी मालमत्तेचा नाश करत नाहीत. होमी जे. भाभा, जेआरडी टाटा, रतन टाटा, झुबिन मेहता आणि बºयाच व्यक्तीरेखांविषयी भारत नेहमीच पारसी समाजाचा ऋणी असणार आहे.