Join us  

गलती से मिस्टेक...! NSEने शेअर केलेत मौनी रॉयचे हॉट फोटो; युजर्स म्हणाले, नॉटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 5:22 PM

वाचा काय आहे प्रकरण

ठळक मुद्देएनएसईने भलेही या चुकीसाठी माफी मागितली. मात्र तोपर्यंत एनएसईची पोस्ट व्हायरल झाली होती.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)ने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर दुपारी एक ट्विट पडले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. होय, एनएसईच्या ट्विटर हँडलवर थेट अभिनेत्री मौनी रॉयचे हॉट फोटो होते. एनएसईने मौनीचे हॉट फोटो शेअर केलेले पाहून काय होणार? सोशल मीडियावर कमेंट्स पाऊस पडला.  वेगवेगळे भन्नाट जोक्स आणि मीम्सचा पूर आला. यापेक्षा सेक्सी चूक मी आजपर्यंत पाहिली नाही, अशा काय काय प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या.

अन् सगळेच हैराण झालेत... दुपारी 12.15 वाजता एनएसईच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट पडली. या पोस्टमध्ये मौनीचे हॉट फोटो पाहून एकच खळबळ उडाली. ही चूक लक्षात यायला एनएसईला बराच वेळ लागला. कारण तोपर्यंत या चुकीचा बोभाटा झाला होता. ही पोस्ट व्हायरल झाली होती.

चूक झाली, माफ करा...

आपली चूक लक्षात येताच एनएसईने  ट्विट करुन माफी मागितली. ‘ दुपारी 12.25 वाजता एनएसईच्या हँडलवर चूकुन एक चुकीची पोस्ट शेअर झाली.  अकाऊंट सांभाळणाºया एजेन्सीद्वारा ही चूक झाली आहे. यामध्ये हॅकिंग झालेली नाही. यासाठी आम्ही सर्व फॉलोव्हर्सची माफी मागतो,’ असे ट्विट एनएसईने केले. युजर्स ‘सैराट’

एनएसईने भलेही या चुकीसाठी माफी मागितली. मात्र तोपर्यंत एनएसईची पोस्ट व्हायरल झाली होती. मग काय,युजर्सनी एनएसईची जबरदस्त मीम्स शेअर केलेत. मजेदार प्रतिक्रिया दिल्या. ‘यापेक्षा सेक्सी चूक मी आजपर्यंत पाहिली नाही,’ असे एका युजरने लिहिले. काहींनी ‘नॉटी एनएसई’ म्हणत, या पोस्टवरून एनएसईची मजा घेतली.‘जेव्हा नोटीस पीरियडमध्ये काम करणार-या कर्मचा-यांना अपेक्षित पगार मिळत नाही तेव्हा हेच घडते, असे पीयूष झा नावाच्या एका युजरने लिहिले.  ‘बाजाराने उसळी घेतली आणि एनएसई मजेच्या मूडमध्ये आली,’ अशी कमेंट एका युजरने केली.   

टॅग्स :मौनी राॅय