Join us
Daily Top 2Weekly Top 5

Osm!! नताशा स्टँकोव्हिचच्या ‘फ्रेश कट’वर हार्दिक पांड्या फिदा...! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 13:28 IST

नताशाने असे काही केलेय की, हार्दिक त्यावर कमेंट्स देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. 

ठळक मुद्दे नताशा ही रिअ लाईफइतकीच रिअल लाईफमध्येही कमालीची बोल्ड आहे.

यंदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटर हार्दिक पांड्याने गर्लफ्रेन्ड नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करून सर्वांना आनंदाचा धक्का दिला. साखरपुड्याची गोड बातमी हार्दिकने स्वत: चाहत्यांसोबत शेअर केली आणि हार्दिक-नताशा हे कपल सेलिब्रिटींच्या चर्चित जोड्यांमध्ये सामील झाले. आता नताशाने असे काही केलेय की, हार्दिक त्यावर कमेंट्स देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. 

होय, नताशाने आपला नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत नताशा एका नव्या लूकमध्ये दिसतेय. होय, तिने नवा हेअरकट केला आहे. ‘फ्रेश कट,’ असे कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आणि हा फोटो बघून हार्दिक घायाळ झाला. हो, नताशाच्या या फोटोवर कमेंट करताना हार्दिकने प्रेम दर्शवणारा एक हार्ट इमोजी पोस्ट केला.

नताशाचा नवा लूक पाहून हार्दिक खल्लास झाला. तोच नाही तर चाहतेही नताशाच्या या लूकवर भाळले. क्युटनेस ओव्हरलोडेड, अशी कमेंट एका चाहत्याने हा फोटो पाहून केली. अन्य युजर्सनी ब्युटिफुल, हॉट, अशा कमेंट्स दिल्यात.  नताशा ही एक सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे.  डीजे वाले बावू या गाण्याने नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली.

इमरान हाश्मीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द बॉडी’ या सिनेमात गाण्यात नताशा आयटम सॉन्ग करताना दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित ‘झिरो’ या सिनेमात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यापूर्वी सत्याग्रह, फुकरे रिटर्न, डॅडी या सिनेमात तिने आयटम नंबर केले होते.

नच बलिए आणि बिग बॉसच्या 8 व्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती. नताशा ही रिअ लाईफइतकीच रिअल लाईफमध्येही कमालीची बोल्ड आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या  बोल्ड व हॉट फोटोंनी भरलेले आहे. हीच बोल्ड नताशा आता पांड्या कुटुंबाची सून होणार आहे.

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्या