Join us

नसिरुद्दीन शहा यांचे कोणतेच सोशल अकाऊंट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:34 IST

सेलिब्रेटींना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी थेट संवाद साधायला नेहमीच आवडत असते. त्यामुळे जवळपास सर्वच स्टार्सचे सोशल मीडियावर अकाऊंट्स आहेत. परंतु ...

सेलिब्रेटींना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी थेट संवाद साधायला नेहमीच आवडत असते. त्यामुळे जवळपास सर्वच स्टार्सचे सोशल मीडियावर अकाऊंट्स आहेत. परंतु अनुपम खेर यांनी नुकताच ट्विटरवर खुलासा केला आहे की नसिरुद्दीन शहा यांचे कोणतेच सोशल अकाऊंट नाही. त्यांच्या नावाने सुरू असलेले सर्व अकाऊंट फेक (बनावटी) आहेत व त्यात केली जाणारी विधानेही त्यांची नाहीत. शोच्यानिमित्त अनुपम खेर दिल्लीला जात असताना त्यांची विमानामध्ये 'अ वेड्नस डे'चे सहकलाकार नसिरुद्दीन शहांची भेट झाली. खेर यांनी ट्विट केले, 'नसिरसोबत बोलताना त्याने मला सांगितले की फेसबुक आणि ट्विटरवर त्यांचे सर्व अकाऊंट खोटे आहेत. त्यांच्या नावाने होणारे सर्व ट्विट आणि पोस्टसुद्धा त्यांचे नाहीत.' सोबत खेर यांनी शहांसोबत एक फोटो देखील अपलोड केला आहे.