Join us  

तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी फटकारलं; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 12:41 PM

naseeruddin shah slams indian muslims: तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर त्यांनी निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी पुन्हा ताबा मिळवल्यामुळे तेथील जनता हवालदिल झाली आहे.

'अफगाणिस्तानवर पुन्हा तालिबानने ताबा मिळवल्यामुळे काही भारतीय मुस्लिमांना आनंद होत आहे', असं वक्तव्य अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.  त्यांच्या या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘द महाराष्ट्रा न्यूज’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी पुन्हा ताबा मिळवल्यामुळे तेथील जनता हवालदिल झाली आहे. परिणामी, अफगाणिस्तानमधील नागरिक पळ काढून अन्य देशांमध्ये आसरा शोधत आहेत. विशेष म्हणजे तालिबानी लोकांचे अत्याचार पाहून त्यांच्यावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. मात्र, काही भारतीय तालिबानी राजवटीचे कौतुक करत आहेत. त्यावर नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली आहे. तालिबानचं समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर त्यांनी निशाणा साधला आहे.

"अफगाणिस्तावर तालिबाबने पुन्हा ताबा मिळवणे ही संपूर्ण जगासाठीच चिंतेची बाब आहे. मात्र, अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यामुळे काही भारतीय मुस्लिमांना आनंद होत आहे आणि हेच सगळ्यात जास्त धोकादायक आहे.  भारतीय इस्माल हा जगातल्या इस्लामपेक्षा कायमच वेगळा राहिला आहे. पण, देव न करो की, ते इतके बदलावेत की आपण त्यांना ओळखूही शकणार नाही", असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "इस्लामला सुधारण्याची गरज आहे की आधुनिकतेची हा प्रश्न प्रत्येक भारतीय मुस्लिमाने स्वतःला विचारला पाहिजे. मी हिंदुस्तानी मुस्लीम आहे आणि मिर्झा गालिब यांनी खूप आधी म्हटल्याप्रमाणे, माझा देवाशी संबंध हा अनौपचारिक आहे. मला राजकीय धर्माची गरज नाही.’

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यापासून तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यात सगळ्यात जास्त त्रास तेथील महिला व मुलांना होत आहे. त्यामुळे येथील नागरिक अफगाणिस्तानातून पळ काढत आहे.  

टॅग्स :नसिरुद्दीन शाहतालिबान