Join us  

‘मुव्ही माफिया’ सारखे काहीही नाही, सगळ्या काही मेंदूंनी रचलेल्या काल्पनिक कथा ...! नसीरूद्दीन शाह बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 1:35 PM

काय म्हणाले नसीर?

ठळक मुद्देसुशांतला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि याच्याशी काहीही देणेघेणे नाही असे वाटत असेल तर आपल्याला आपले काम केले पाहिजे, असे नसीर म्हणाले.

नेपोटिजम, आऊटसाइडर्स विरूद्ध इनसाइडर्स या मुद्यावरून बॉलिवूडचे वातावरण ढवळून निघाले असताना ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी पहिल्यांदा या मुद्यावर  प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडमध्ये ‘मुव्ही माफिया’ सारखे काहीही नाही. या सर्व काही निवडक रचनात्मक मेंदूंनी रचलेल्या काल्पनिक कथा आहेत, असे नसीरूद्दीन यांनी म्हटलेय.सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आणि या संदर्भाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून उफाळलेला वाद यावर ते बोलत होते. सुशांतप्रकरणावरही ते बोलले.

काय म्हणाले नसीर?सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास आता एकप्रकारचा रिअ‍ॅलिटी शो बनला आहे. तुम्ही याला फॉलो करत आहात? यात राजकारण आहे. काही मीडिया हाऊसचे असंवेदनशील मीडिया कव्हरेज आहे आणि सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत आहोत म्हणणारे काही लोक आहे. हा सगळा वेडेपणा आहे. शुद्ध वेडेपणा. मी याला अजिबात फॉलो केले नाही. तो तरूण मुलगा गेला, तेव्हा मला प्रचंड दु:ख झाले. मी त्याला ओळखत नव्हतो. पण त्याचे भविष्य उज्ज्वल होते आणि आता ते व्यर्थ झाले. पण असे असले तरी मी या प्रकरणावरून सुरु असलेला बकवासपणा फॉलो केलेला नाही. बॉलिवूडबद्दल फ्रस्टेशन असणारा प्रत्येकजण मीडियासमोर येऊन वाट्टेल ते बरळत आहे. हा प्रकार खरोखर नीचपणा आहे. माझा म्हणण्याचा अर्थ हाच की, तुम्ही तुमच्या तक्रारी स्वत:पर्यंत ठेवा. त्यात कुणालाही रस असण्याचे कारण नाही. सुशांतला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि याच्याशी काहीही देणेघेणे नाही असे वाटत असेल तर आपल्याला आपले काम केले पाहिजे, असे नसीर म्हणाले.

आऊटसाइडर्स विरूद्ध इनसाइडर्सवर म्हणाले...आऊटसाइडर्स, इनसाइडर्स हे काय आहे? हा काय मूर्खपणा आहे. एका यशस्वी अभिनेत्याने आपल्या मुलांना हे क्षेत्र निवडण्यास का प्रोत्साहित करू नये? बिझनेसमॅन, वकील, डॉक्टर हे असे करत नाही? नुसरत फतेह अली खानच्या नव्या पिढीतील लोकांनी गायक बनू नये? ओम पुरींसारखा दिग्गज अभिनेता कोणाच्या शिफारसीने मुंबईला आले होते? आऊटसाइडर्स विरूद्ध इनसाइडर्स हा वाद, नेपोटिजम सगळे बंद व्हायला हवे. मायानगरीत अ‍ॅक्टर बनण्यासाठी येणा-या प्रत्येकाला याची जाणीव असायला हवी की, त्याला एक लांब, कठीण, एकाकीपणाने भरलेल्या प्रवासासाठी सज्ज असले पाहिले. याठिकाणी टिकण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास असला पाहिजे. तुम्ही कोणाच्या पाठबळाने इंडस्ट्रीत येऊ शकता पण पुढे जाऊ शकत नाही. इंडस्ट्रीत मुव्ही माफिया वगैरे असा काहीही प्रकार नाही. मी कधीही हे अनुभवले नाही. माझ्या कामात कोणतीही अडचण आली नाही. गेल्या 40-50 वर्षांचा माझा प्रवास संथ असेलही पण माझ्या मार्गात कोणी अडचण निर्माण करतेय, असे मला कधीही जाणवले नाही. 

टॅग्स :नसिरुद्दीन शाह