Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रॉकस्टार' फेम नर्गिस फाखरी पुन्हा पडली प्रेमात, अमेरिकन शेफला करतेय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 15:05 IST

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी 'रॉकस्टार' सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली.

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी रॉकस्टार सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. सिनेमात ती रणबीर कपूरसोबत दिसली होती. नर्गिस नेहमीच तिच्या लव्ह लाईफसाठी चर्चेत असते. उदय चोप्रासोबतच्या त्याच्या नात्यांची खूप चर्चा राहिली.  उदय चोप्राशी ब्रेकअप झाल्यानंतर  ती फिल्ममेकर मॅट अॅलोन्झो याला डेट करते होती यानंतर निर्गिस आता अमेरिकन शेफ जस्टिन संटोसला डेट करते आहे. 

जस्टिनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ नर्गिस नेहमी सोशल मीडियावर करत असते. सध्या हे कपल व्हॅकेशनवर आहे. याच दरम्यान जस्टिन नर्गिसला शूटिंग रेंजवर गनशूट शिकवतो आहे. अलीकडेच नर्गिसने व्हॅकेशन दरम्यानचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहे, ज्यात ती जस्टिनसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतेय. नर्गिसच्या या फोटोवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, नर्गिस 'तोरबाज'मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत संजय दत्त, राजू चड्ढा, पुनीत सिंग आणि अन्य कलाकार दिसणार आहेत. नर्गिस शेवटची 'अमावस'मध्ये दिसली होती, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. 

टॅग्स :नर्गिस फाकरी