Join us

नणंद श्वेता बच्चनला आवडत नाही ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:00 IST

छोटया पडद्यावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा बच्चन ही भाऊ-बहिणीची जोडी बघावयास मिळाली. आत्तापर्यंत बऱ्याच भाऊ-बहिणींची जोडी पाहायला मिळाल्या आहेत.

बॉलिवूडच्या नणंद-भावजयी म्हणून श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्याकडे पाहिले जाते. त्या दोघी कधी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात तर कधी तक्रारी. अशातच छोटया पडद्यावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा बच्चन ही भाऊ-बहिणीची जोडी बघावयास मिळाली. आत्तापर्यंत बऱ्याच भाऊ-बहिणींची जोडी पाहायला मिळाल्या आहेत. अर्जुन कपूर-जान्हवी कपूर, सोनम कपूर-रिया कपूर-हर्षवर्धन कपूर, शाहिद कपूर आणि ईशान खट्टर दिसले.  

यादरम्यान, करणने दोन्ही भाऊ-बहिणींचे बरेच खुलासे केलेत. अभिषेक म्हणाला तो आपल्या आईचा जवळचा आहे, तर श्वेताने मैं पिता के आंखों का तारा हू असे सांगितले. याचबरोबर रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने श्वेताला सेलेब्स (सलमान, शाहरुख, आमिर, हृतिक आणि अजय) यांच्या हॉटनेसच्या हिशोबाने रँक विचारला. तेव्हा श्वेताने सर्वात आधी सलमानचे नाव घेतले. 

त्यानंतर तिला ऐश्वर्याच्या चांगल्या-वाईट सवयीबद्दल विचारले. यावर ऐश्वर्या मेसेज आणि फोनचे उत्तर देण्यास खूप वेळ लावते ही सवय मला आवडत नाही, असे ती म्हणाली. तसेच ऐश्वर्या एक सेल्फ मेड स्ट्राँग महिला असून मला ही गोष्ट तिची खूप आवडते, असे तिने सांगितले. 

टॅग्स :कॉफी विथ करण 6करण जोहर