Join us  

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिले महिला आयोगासमोर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 7:00 PM

मीटू मोहिमेअतंर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे वकील अनिकेत निकम यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देतनुश्री दत्त यांनी लावले आरोप नाना पाटेकरांच्या वकिलांनी फेटाळून लावले आहेत

#मीटू मोहिमेअतंर्गततनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे वकील अनिकेत निकम यांनी सांगितले आहे. हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला. ऐवढ्यावरच न थांबता तिने यासंदरर्भात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तनुश्रीच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने नाना पाटेकर यांना नोटीस बजावली होती. मात्र हे सर्व आरोप नाना पाटेकरांच्या वकिलांनी फेटाळून लावले आहेत. तनुश्रीने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडे नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली.  

#Metoo या मोहिमे अंतर्गत तनुश्रीने  २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या आरोप केला आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. विशेष म्हणजे, दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळत गेले. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत. नाना पाटेकर यांच्या वकिलांकडून आलेल्या उत्तरानंतर तनुश्री याला कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.     

टॅग्स :मीटूनाना पाटेकरतनुश्री दत्ता