Join us

पती Mahesh Babuसोबत लाखोंचा कुर्ता घालून पार्टी पोहोचली नम्रता शिरोडकर, किंमत वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 10:54 IST

नम्रता शिरोडकरने प्रिंडेट कुर्ता घातला आहे ज्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

टीव्ही पासून ते बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रिर्यंत ग्लॅमर जगाशी जोडले गेलेले कलाकार त्यांच्या लग्झरी लाईफला घेऊन देखील चर्चेत असतातत. अनेकवेळा हे कलाकार इतके महागडे कपडे आणि बॅग कॅरी करतात की किंमत ऐकून चाहत्यांना धक्का बसतो. अलीकडेच नम्रता शिरोडकर असाच एक महागडा ड्रेस घातला होता ज्यामुळे चर्चेत आहे. 

आपल्या छोट्याशा कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिलेल्या नम्रता शिरोडकर पती महेश बाबू आणि मुलगी सितारासोबत बेबी शॉवर पार्टीला गेली होती. नम्रताच्या म्हणण्यानुसार, ही तिची मुलगी सितारासोबतची पहिली ऑफिशल पार्टी होती, जी त्यांनी मनापासून एन्जॉय केली. नम्रताने या पार्टीतील अनेक फोटो शेअर केले आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये नम्रता पती महेश आणि बेटी सितारासोबत त्यांच्या बाकी मित्र-मैत्रिणीसोबत एन्जॉय करताना दिसतायेत. महेश बाबू ब्ल्यू टी-शर्ट आणि ब्राऊन कलरच्या पॅंटमध्ये खूपच हँडसम दिसतोय. लाडकी लेक सितारा पिंक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय. 

नम्रता शिरोडकरने प्रिंडेट कुर्ता घातला आहे ज्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. नम्रताने पार्टीसाठी निवडलेल्या कुर्ताची किंमत 4 लाख रुपये आहे. नम्रताच्या जॉर्जिओ अरमानीच्या ग्राफिक-प्रिंटेड सिंगल-ब्रेस्टेड कोट ड्रेसची किंमत 3.99 लाख रुपये आहे. 

नम्रताने 'वास्तव', 'पुकार', 'कच्चे धागे', 'आगाज' आणि 'दिल विल प्यार व्यार' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2005 मध्ये महेश बाबूसोबत लग्न केल्यानंतर नम्रताने बॉलिवूडला राम-राम केला. त्यांना दोन मुले, गौतम नावाचा मुलगा आणि सितारा नावाची मुलगी. 

टॅग्स :नम्रता शिरोडकरमहेश बाबू