Join us

​नागार्जुनच्या ‘बोल्ड’ सूनेचे ‘बोल्ड’ विधान! म्हणे, जेवणापेक्षा सेक्स अधिक आवडेल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 13:17 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व अभिनेत्री समंथा रूथ प्रभू  हे दोघे येत्या ६ आक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व अभिनेत्री समंथा रूथ प्रभू  हे दोघे येत्या ६ आक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. यानंतर नागा चैतन्य व समंथा दोघेही ४० दिवसांच्या हनीमूनवर जाणार आहेत. तत्पूर्वी  नागार्जुनच्या होणाºया सूनबाई  सध्या जरा जास्तच जोरात आहे.  होय, अलीकडे समंथाने एका फॅशन मॅगझिनसाठी अतिशय बोल्ड फोटोशूट करून धम्माल उडवून दिली होती. पण या बोल्ड फोटोशूटपेक्षा समंथा सध्या तिच्या एका बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे. होय, एका मुलाखतीत समंथाने असे काही बोल्ड स्टेटमेंट दिली की, सगळेच अवाक् झालेत.आता हे स्टेटमेंट काय होते, हे ऐकण्यास तुम्ही उत्सूक असाल तर आम्ही ते सांगितले पाहिजेच. त्याचे झाले असे की, एका मुलाखतीत, समंथाला सेक्स आणि फूड यापैकी एक निवडायला सांगितले गेले. यावर संमथा काय बोलली माहितीय? खाण्यापेक्षा मी सेक्स प्रीफर करेल, असे ताडकन ती बोलून गेली. मला सेक्स आवडेल. मी कुठल्याही दिवशी भुकेली राहू शकते, असे ती म्हणाली.ALSO READ : नागार्जुन यांनी सून समंथाशी केले चॅट...झाले व्हायरल!! नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याचा प्रेयसी आणि प्रसिद्ध अभिनेत्री समंथा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे दोघे ब-याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडिया आणि चाहत्यांच्या वतुर्ळात समंथा आणि नागा चैतन्य यांना ‘समचै’म्हणून ओळखले जाते. हनीमूनवरून परतल्यावर समंथा शिवकार्तिकेयनच्या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. लवकरच तिचा ‘राजू गरी गढी2’  हा चित्रपट रिलीज होणार आहे. यात संमथाचे सासरे अर्थात नागार्जुनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.