Join us  

प्रेयसी सामंथा रूथसोबत लग्नाच्या पवित्र बंधनात अडकला नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 8:37 AM

नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य हा प्रेयसी सामंथा रूथ हिच्याशी विवाहबंधनात अडकला आहे.

तेलगू सुपरस्टार नागार्जुन अक्की नेनीचा मुलगा नागा चैतन्य याचा शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिच्याशी धुमधडाक्यात विवाह पार पडला. दोघांचाही विवाह हिंदू रितीरिवाजानुसार पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत खूपच आनंदी दिसत आहेत. या विवाहसोहळ्यामुळे सामंथा आणि चैतन्यचे चाहते खूपच आनंदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. शिवाय या दोघांचे प्रीवेडिंग शूटपासून लग्नापर्यंतचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाविषयी खूपच उत्सुकता होती. अखेर हे दोघे विवाहबंधनात अडकले असून, अतिशय शाही पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा गोवा येथे पार पडला. नवरदेव बनलेला नागा चैतन्य फोटोमध्ये खूपच स्मार्ट दिसत आहे, तर नवरीच्या अवतारात सामंथा रूथ हिचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे. दरम्यान, या दोघांचा विवाहसोहळ्यात गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. सुपरस्टार नागार्जुन याने स्वत:चा मुलगा आणि सुनेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या चाहत्यांना याबाबतची आनंदाची बातमी दिली. दरम्यान, या दोघांची पहिली भेट २००९ मध्ये ‘ये माया चेसाव’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सामंथाचा हा पहिलाच चित्रपट होता. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याअगोदर सामंथा रूथ आणि नागा चैतन्य तब्बल सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले.   हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केल्यानंतर आज हे जोडपे कॅथोलिक रितीरिवाजानुसार पुन्हा लग्नाच्या गाठी बांधणार आहेत. लग्नाचे सर्व सोपोस्कार पार पडल्यानंतर ९ आॅक्टोबरला हैदराबाद येथे भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. या रिसेप्शनमध्ये टॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. सूत्रानुसार या विवाहसोहळ्यासाठी दहा कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. लग्नाचे तीन दिवसांचे सर्व विधी पार पाडल्यानंतर सामंथा आणि चैतन्य त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करणार आहेत. त्यानंतर तब्बल ४० दिवसांच्या हनिमुनला जाणार आहेत.