Join us  

'तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक', सुशांतच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रिया चक्रवर्तीची इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 4:54 PM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज एक वर्षे पूर्ण झाले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज एक वर्षे पूर्ण झाले. आजही चाहत्यांच्या मनातील त्याची जागा कायम आहे. मात्र आता फक्त त्याच्या आठवणीं उरल्या आहेत. दरम्यान आता त्याच्या पहिल्या पुण्यतिथीला सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने भावूक पोस्ट लिहून त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही वेळेपूर्वी रियाने इंस्टाग्रामवर सुशांत आणि तिचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

रिया चक्रवर्तीने तिचा आणि सुशांतचा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले की, एक क्षणदेखील असे वाटले नाही की आता तू नाही आहेस, लोक म्हणतात की वेळ सर्व काही ठीक करतो, माझ्यासाठी तुझ माझा वेळ माझे सर्व काही होतास. मला माहित आहे की वरून तू मला पाहत आहेस, चंद्रावरून तू मला तुझ्या दुर्बीणीतून पाहत आहेस आणि माझी रक्षा करत आहेस. मी दररोज तू मला घ्यायला येशील म्हणून वाट पाहत असते. मी तुला सगळीकडे शोधत असते. 

रियाने पुढे या पोस्टमध्ये म्हटले की, मी दररोज कोलमडून जाते मग मला तू सांगितलेली गोष्ट आठवतो. तुला मला सांगायचास की, तुझ्याकडे हा बेबू आहे आणि मग मी स्वतःला पुढील दिवसासाठी तयार करायचे. जेव्हा मला वाटते की तू इथे नाही आहेस, तेव्हा भावनांचे एक बंधन माझे शरीराला पार करतो. हे सर्व लिहिताना माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत.

रिया म्हणाली की, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तू माझे जीवन तुझ्यासोबत घेऊन गेला आहेस. ती पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघू शकत नाही. मी तुझ्याशिवाय आजही एकटी उभी आहे. माझा प्रिय सनशाईन, मी आजही तुला दररोज मालपुआ खाऊ घालण्याचे वचन देते आणि फिजिक्सचे पुस्तक वाचते. माझ्याकडे परत ये. मला तुझी खूप आठवण येते माझा मित्र, माझे प्रेम बेबू आणि पुटपुट नेहमीसाठी...मनापासून

सुशांतच्या जीवनातील रिया चक्रवर्ती सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. ती सुशांतसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. त्यामुळे सुशांतच्या निधनानंतर तिची बऱ्याचदा चौकशी करण्यात आली. सुशांतच्या वडिलांनी तिच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आणि १५ कोटी बळकावल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या निधनानंतर ड्रग्स कनेक्शन समोर आले. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती