Join us

MUST WATCH Chapter 1 !! ​‘मेरी प्यारी बिंदू’चा मसालेदार, चटकदार, रोमॅन्टिक ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 15:01 IST

परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा स्टारर ‘मेरी प्यारी बिंदू’चा ट्रेलर आज रिलीज झाला.

परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा स्टारर ‘मेरी प्यारी बिंदू’चा ट्रेलर आज रिलीज झाला. या चित्रपटाचे टीजर आणि परिणीतीच्या आवाजातील याचे एक गीत पाहून अनेकजण ‘मेरी प्यारी बिंदू’चा ट्रेलर पाहण्यास आतूर झाले होते. अखेर हा ट्रेलर आला. चित्रपटाचा टीजर जिजका शानदार होता, अगदी तितकाच सुंदर हा ट्रेलर आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा एका गायिकेच्या  तर आयुष्यमान लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ALSO READ :  ‘मेरी प्यारी बिंदू’चा मन मोहून टाकणारा रोमॅन्टिक टीजर!ट्रेलरमध्ये अभिमन्यू म्हणजेच चित्रपटाचा हिरो आयुष्यमान, एक प्रेमकथा लिहितो आहे. ही प्रेमकथा असते त्याच्या स्वत:ची. प्रत्येक प्रेमकथेप्रमाणेच अभिमन्यू व बिंदूची प्रेमकहाणी सुद्धा सुरुवातीला बरीच चटकदार आणि तितकीच मसालेदार आहे. अभिमन्यू व बिंदूची पहिली भेट कशी व कुठे झाली, हे तुम्हाला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. होय, १९८३ मध्ये अभिमन्यू व बिंदू पहिल्यांदा एकमेकांना भेटतात. बिंदू अभिमन्यूच्या शेजारी राहायला आलेली असते आणि अभिमन्यूची आई त्यांच्यासाठी समोसे आणि चटणी पाठवते. आईने दिलेले हे समोसे आणि चटणी घेऊन अभिमन्यू पोहोचतो तो थेट बिंदूपर्यंत. पहिल्या भेटीत बिंदू अभिमन्यूला तिचा हेडफोन देते. हे ऐक, हे तुझे आयुष्य बदलेल, असे ती त्याला म्हणते. त्याक्षणाला अभिमन्यूला काहीही कळत नाही. बिंदू गाण्याबद्दल बोलतेय, हेडफोनबद्दल बोलतेय की स्वत:बद्दल हेच त्याला समजत नाही. हा ट्रेलर पाहिल्यानंतर ‘मेरी प्यारी बिंदू’ पाहण्यासाठी तुम्ही कधीनव्हे इतके उतावीळ व्हाल, हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. तेव्हा बघा तर, ‘मेरी प्यारी बिंदू’चा मसालेदार, चटकदार, रोमॅन्टिक ट्रेलर तुम्हाला पाहायलाच हवा.अक्षय राय दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी १२ मे रोजी चित्रपटगृहांत येणार आहे.