Join us

​मित्रांसोबत टीव्ही बघत होता ‘हा’ संगीतकार, अचानक १२ व्या माळ्यावरून उडी घेत केली आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 13:18 IST

२९ वर्षांचा करण जोसेफ अनेक स्वप्न घेऊन बॉलिवूडमध्ये आला होता. पण स्वप्नपूर्तीचा त्याचा प्रवास अचानक थांबला. बेंगळुरूच्या करणने मुंबईच्या वांद्रयातील एका बहुमजली इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.

२९ वर्षांचा करण जोसेफ अनेक स्वप्न घेऊन बॉलिवूडमध्ये आला होता. पण स्वप्नपूर्तीचा त्याचा प्रवास अचानक थांबला. बेंगळुरूच्या करणने मुंबईच्या वांद्रयातील एका बहुमजली इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण गेल्या महिनाभरापासून  ऋषी शहा या आपल्या मित्रासोबत राहत होता. तो राहत असलेला बुलॉक रोडवरील फ्लॅट एका कंपनीच्या मालकीच्या आहे. याच फ्लॅटच्या खिडकीतून करणने उडी घेतली.  काल रात्री साडे आठच्या सुमारास करण ऋषी व अन्य काही मित्रांसोबत टीव्ही बघत होता. अचानक तो उठला अन् खिडकीजवळ जात, त्याने १२ व्या माळ्यावरून उडी घेतली. मित्रांना खूप मोठा आवाज ऐकू आल्यानंतर त्यांना याबद्दल कळले. त्यांनी बाल्कनीत जावून बघितले असता, करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आत्महत्येवेळी करण नशेत होता, असेही कळते. यानंतर करणच्या मित्रांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी करणला एका जवळच्या रूग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले.  कथितरित्या करण गेल्या काही दिवसांपासून निराश होता. पोलिस त्याच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेत आहेत. आत्महत्येपूर्वी करणची कुठलीही सुसाईड नोट जप्त झालेली नाही.करण पियानो वाजवायचा. अनेक कंसर्टमध्ये त्याने आपल्या कलेचे प्रदर्शन केलेय. महिनाभरापूर्वीच तो मुंबईत आला होता.दरम्यान करणच्या मृत्यूवर गायक व संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी याने दु:ख व्यक्त केले आहे.