Join us

​‘गोल्ड’ रिलीज होण्यापूर्वीच मौनी रायच्या हाती लागला दुसरा सिनेमा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 11:39 IST

मौनी रायच्या चाहत्यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय. होय, मौनी बॉलिवूडमध्ये जी येतेय. अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’मध्ये मौनीची वर्णी लागली. ...

मौनी रायच्या चाहत्यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय. होय, मौनी बॉलिवूडमध्ये जी येतेय. अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’मध्ये मौनीची वर्णी लागली. केवळ वर्णीच नाही तर मौनीने या चित्रपटाचे शूटींगही सुरु केले आहे. मौनीचा हा पहिला बॉलिवूड डेब्यू सिनेमा आता कधी एकदा रिलीज होतो, असे तिच्या चाहत्यांना झाले आहे. अर्थात हा चित्रपट रिलीज होण्याआधीच मौनीच्या हाती आणखी एक दुसरा सिनेमा लागल्याची खबर आहे. होय, सलमान खानने ‘रात बाकी’ या चित्रपटासाठी मौनीला विचारणा केली आहे. ‘रात बाकी’ या चित्रपटातून सलमान खान आयुष शर्माला लॉन्च करणार आहे. (आता हा आयुष शर्मा कोण? असे विचारू नका. अहो, कोण म्हणजे काय, सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा.) गेल्या अनेक दिवसांपासून सलमान मौनीला लॉन्च करणार, अशी खबर होती. मात्र याबाबतीत अक्षयने बाजी मारली. पण कदाचित सलमानच्या डोक्यातून मौनी गेलेली नाहीच. त्यामुळे त्याने आयुषसोबत तिला संधी देण्याचे ठरवलेले दिसते.तूर्तास मौनी ‘गोल्ड’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पुढीत २० ते २५ दिवस मौनी या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी असणार आहे. यात ती एका आगळ्या-वेगळ्या लूकमध्ये दिसणार असल्याचे कळतेय. एकंदर काय, तर मौनी सध्या जोरात आहे. बॉलिवूडची लॉटरी लागल्यानंतर तीही अतिशय आनंदात आहे. अर्थात बॉलिवूडची लॉटरी लागली म्हणून छोट्या पडद्याला राम राम ठोकण्याचा तिचा काहीही इरादा नाही. मी बॉलिवूडमध्ये गेले तरी छोट्या पडद्यावर काम करणे सुरूच ठेवेल, असे मौनीने आधीच स्पष्ट केले आहे. शेवटी छोट्या पडद्यानेच मौनीला खरी ओळख मिळवून दिलीय, हे विसरून कसे चालेल.