मुन्नाभाईचा मुलगी त्रिशालासोबत चॅट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 00:49 IST
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त दोन दिवसांपूर्वी येरवडा जेलमधून सुटला आहे. जेलमधून सुटल्याचा आनंद त्याने मुलगी त्रिशालासोबत सेलिब्रेट केला. ती ...
मुन्नाभाईचा मुलगी त्रिशालासोबत चॅट!
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त दोन दिवसांपूर्वी येरवडा जेलमधून सुटला आहे. जेलमधून सुटल्याचा आनंद त्याने मुलगी त्रिशालासोबत सेलिब्रेट केला. ती युएसमध्ये शिक्षणासाठी राहते. व्हर्च्युअल माध्यमातून तिने त्याच्याशी संपर्क आणि संवाद साधला.जेलमधून सुटल्यानंतर त्याने कुटुंबीय, मित्रपरिवार, फॅन्स आणि माध्यमांच्या काही व्यक्तींसोबत संवाद साधला. त्यातून त्याने त्याची मुलगी त्रिशालासोबत बोलण्यासाठी वेळ काढला. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यातून ती तिच्या पप्पांना खुप दिवसांनंतर भेटल्याचा आनंद अत्यंत भावुक होऊन व्यक्त करत आहे. ती ‘पप्पा ड्यूक्स’ म्हणत त्यांचे स्वागत करते.तसेच एक व्हिडिओ तिने ेशेअर केला असून त्याला कॅप्शन दिले की,‘ माय पापा ड्यूक्स! लव्ह्ज यू. लूक अॅट दॅट स्माईल! आॅन द फोन विथ डॅडी डिअरेस्ट, हॅड टू टेक हिम टू गेट माय हेअर डन अॅज वेल फॉर अवर सेलिब्रेशन! हाहाहा वेलकम होम पापा ड्यूक्स! सेल्फी. आय लव्ह यू संजय दत्त.’