Join us

मुन्नाभाई नाही करणार ‘बाजार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 13:12 IST

मुन्नाभाई संजय दत्तनं निखील अडवाणीच्या आगामी सिनेमात काम करण्यास नकार दिलाय.. निखील अडवाणी आपल्या आगामी बाजार या सिनेमाची तयारी ...

मुन्नाभाई संजय दत्तनं निखील अडवाणीच्या आगामी सिनेमात काम करण्यास नकार दिलाय.. निखील अडवाणी आपल्या आगामी बाजार या सिनेमाची तयारी करतायत. या सिनेमातील भूमिकेसाठी निखीलनं संजय दत्तकडे विचारणा केली. मात्र संजय दत्तनं निखीलची ही ऑफर धुडकावलीय. जेलमधून बाहेर आल्यानंतर मुन्नाभाई आपल्या कमबॅक सिनेमावर काम करतोय. सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी सिनेमात संजय दत्त सध्या काम करत असून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा विचार आहे. त्यामुळंच बाजार सिनेमात काम करण्यास संजूबाबानं नकार दिलाय.