Join us  

सुश्मिताच्या लेकीचा अन् मुनव्वर फारुकीचा कारमधील व्हिडीओ व्हायरल; चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 1:23 PM

Munawar faruqui and renee: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रेने आणि मुनव्वर फारुकी एकाच कारमधून खाली उतरल्याचं दिसून येत आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा bigg boss 17 हा शो नुकताच संपला आहे. यंदाच्या पर्वात मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला असून सध्या तो सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्ये सोशल मीडियावर मुनव्वरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिची लेक रेने दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'इंस्टंट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रेने सेन (renee sen) आणि मुनव्वर फारुकी एकाच कारमधून खाली उतरल्याचं दिसून येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत सोशल मीडिया सेन्सेशन ओरी सुद्धा दिसून येत आहे. हे तिघेही जण एका पार्टीसाठी निघल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रेने हिने पीच कलरचा स्ट्रॅपी क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिम जीन्स परिधान केली होती. सोबतच हाय हिल्स घातले होते. तर, मुनव्वरने ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले होते. 

रेने आणि मुनव्वर यांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमालीच्या कमेंट केल्या आहेत. सुश्मिताची लेक मुनव्वरसोबत काय करते? असा प्रश्न त्यांना पडला आहे. अद्याप तरी रेने आणि मुनव्वर यांची मैत्री कशी झाली?, ते एकमेकांना कसे ओळखतात हे स्पष्ट झालं नाही. तरी सुद्धा त्यांच्या या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, रेने हिने २०२१ मध्ये सुट्टबाजी या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. इतकंच नाही तर सुश्मिताच्या ताली या वेबसीरिजमधील महामृत्युंजय मंत्र देखील रेने हिने म्हटला होता.

 

टॅग्स :सुश्मिता सेनबिग बॉससेलिब्रिटीवेबसीरिजसिनेमा