Join us  

Mumtaz Birthday: कुठल्याच हिरोला मुमताज नको होती, सहअभिनेत्रीही तिच्याशी बोलायच्या नाहीत...! वाचा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 2:52 PM

Mumtaz Birthday: कुठलाही हिरो तिच्यासोबत काम करायला तयार नव्हता. पण काळ बदलला आणि पुढे याच हिरोईनसोबत काम करण्यासाठी अभिनेत्यांमध्ये चढाओढ लागली. ही हिरोईन दुसरी तिसरी कुणी नसून मुमताज होती.

Mumtaz Birthday:  60 आणि 70 च्या दशकात एक हिरोईन फिल्म इंडस्ट्रीत एका मोठ्या संधीच्या शोधात होती. पण कुठलाही हिरो तिच्यासोबत काम करायला तयार नव्हता. पण काळ बदलला आणि पुढे याच हिरोईनसोबत काम करण्यासाठी अभिनेत्यांमध्ये चढाओढ लागली. ही हिरोईन दुसरी तिसरी कुणी नसून मुमताज होती. होय, आपल्या मनमोहक हास्याने आणि सौंदर्याने खिळवून ठेवणारी अभिनेत्री मुमताज (Mumtaz ). आज तिचा वाढदिवस.

वयाच्या 11 व्या वर्षी अ‍ॅक्टिंग डेब्यू करणाऱ्या मुमताजचं बालपणअतिशय गरिबीत गेलं. मुंबईच्या झोपडपट्टीत ती जन्मली आणि तिथेच लहानाची मोठी झाली. झोपडपट्टीतील मुलगी एक दिवस बॉलिवूडची स्टार होईल, अशी कल्पनाही तेव्हा कुणी केली नव्हती. पण मुमताज स्टार बनली. केवळ स्टार नाही तर सर्वाधिक कमाई करणारी स्टार. अर्थात यामागेही तिचा स्वत:चा मोठा स्ट्रगल होता.

मुमताज यांच्या सौंदर्याचे लाखो ‘दिवाने’ होते. पण सुरूवातीच्या काळात एकही हिरो त्यांच्यासोबत काम करण्यास तयार होईना. याचं कारण म्हणजे मुमताज यांनी केवळ वयाच्या 12 वर्षी बॉलिवूडमध्ये काम करणं सुरु केलं होतं. त्यांच्या कमी वयामुळे कुठलाही निर्मार्ता-दिग्दर्शक इतकंच काय तर कुठलाही हिरो त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. त्याचमुळे मुमताज यांना सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांत साईड हिरोईन म्हणून काम करावं लागलं. पण याऊपरही मुमताज यांनी स्वत:ची छाप सोडली. आता तरी आपल्याला लीड हिरोईनची भूमिका मिळेल, असा मुमताज यांचा अंदाज होता.

पण झालं उलटंच. त्यांचा संघर्ष सुरुच होताच. इतका की, अनेक खस्ता खाल्लयानंतर मुमताज यांनी बी- ग्रेड चित्रपटांचा आधार घ्यावा लागला. यादरम्यान मुमताज यांनी 16 अ‍ॅॅक्शन चित्रपट केलेत. यात त्या दारा सिंग यांच्यासोबत झळकल्या. ही जोडी लोकांना आवडली आणि या जोडीचे 10 चित्रपट हिट ठरले. पण या अ‍ॅक्शन चित्रपटांमुळे मुमताज यांची प्रतीमा स्टंट हिरोईन अशी झाली. अशा स्थितीतही मुमताज ए-ग्रेड चित्रपटांत काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण तरीही कुणीही त्यांच्यासोबत काम करण्यास तयार होईना.अगदी धर्मेन्द्र आणि शशी कपूर यांनीही मुमताज यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. 

 पण मुमताज यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा ए-ग्रेड चित्रपटांत सपोर्टींग रोल सुरु करणं सुरु केलं. काजल, खानदान, मेरे सनम आणि पत्थर के सनम यासारख्या चित्रपटात मुमताज यांनी साईड रोल केलेत. अखेर मुमताज यांना राजेश खन्ना यांच्यासोबत लीड हिरोईन म्हणून संधी मिळाली आणि ही जोडी कमालीची गाजली.  या जोडीनं दो रास्ते, सच्चा झूठा, आपकी कसम, अपना देश, प्रेम कहानी, दुश्मन, बंधन, रोटी अशा यशस्वी चित्रपटांत काम केलं. यानंतर मुमताज यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :मुमताजबॉलिवूड