Join us  

हाजिर हो! कंगनाला मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश....

By अमित इंगोले | Published: November 03, 2020 3:12 PM

आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीला पुन्हा समन्स पाठवला आहे. आणि त्यांना १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

कंगना रणौत जेव्हापासून सोशल मीडियावर आली तेव्हापासून ती वादग्रस्त ट्विट करून चर्चेत आहे. पण तिला हे काही वादग्रस्त ट्विट करणं चांगलंच महागात पडलं आहे. काही ट्विटवरून तिच्यावर पोलिसात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीला पुन्हा समन्स पाठवला आहे. आणि त्यांना १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

एएनआयने ट्विट करून कंगना रणौतला पाठवण्यात आलेल्या समन्सची माहिती दिली. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं की, कंगना रणौत आणि रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून त्यांना १० नोव्हेंबरआधी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

हा समन्स कंगना विरोधात मुंबईतच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पाठवण्यात आला आहे. स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल विरोधात १७ ऑक्टोबरला एफआयआर दाखल केला होता. कंगना आणि तिच्या बहिणीवर सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. (जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप...)

मुंबईतील एका कोर्टाने मुंबई पोलिसांना कथितपणे धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपात कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल विरोधात तक्रार दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने हा आदेश दिग्दर्शक मुनव्वर अली सय्यदच्या तक्रारीवरून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.

सय्यद यांच्या वकिलानुसार, तक्रारीत म्हटलं होतं की, गेल्या दोन महिन्यांपासून कंगना आपल्या ट्विट आणि टीव्हीवरील मुलाखतींच्या माध्यमातून बॉलिवूडला भाई भतीजावादाचा गढ आणि भेदभावाचं स्थान असं म्हणून बदनाम करत आहे. तक्रारदार म्हणाले होते की, कंगनाने फारच आक्षेपार्ह वक्तव्ये केली. तिने केवळ तक्रारदाराचीच नाही तर अनेक कलाकारांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. 

टॅग्स :कंगना राणौतमुंबई पोलीस