Join us  

Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर Kranti Redkarचं ट्विट, म्हणाली, प्रवाहाविरुद्ध पोहताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:42 AM

Mumbai Drug Case: मुंबईतील क्रूझवर झालेल्या ड्रग्स केस प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर काल प्रभाकर साईल या किरण गोसावीच्या बॉडीगार्डने गंभीर आरोप केले होते.

मुंबई - मुंबईतील क्रूझवर झालेल्या ड्रग्स केस प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर काल प्रभाकर साईल या किरण गोसावीच्या बॉडीगार्डने गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींचे डील झाले होते. तसेच १८ कोटींना व्यवहार पक्का झाला होता. त्यातील आठ कोटी रुपये हे समीर वानखेडेंना दिले जाणार होते. असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. दरम्यान, या आरोपांनंतर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर हिने ट्विट केले आहे.

क्रांती रेडकर या ट्विटमध्ये म्हणाली की, जेव्हा तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहता तेव्हा बुडण्याचा धोका असतो. मात्र जेव्हा जगातील सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्यासोबत असतो तेव्हा जगातील कुठलीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. सत्यमेव जयते. 

काल प्रभाकर साईल या किरण गोसावीच्या बॉडीगार्डने केलेल्या धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे खळबळ उडाली होती. आर्यन खान प्रकणामध्ये २५ कोटींची डिल ठरली होती. त्यामधील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्याचे ठरले होते. तसेच कोऱ्या कागदावर आपल्या सह्या घेण्यात आल्या होत्या, असा दावा प्रभाकर साईलने केला होता. प्रभाकर साईलने केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. 

टॅग्स :क्रांती रेडकरसमीर वानखेडेमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी