Join us  

'सगळे जण धर्म नष्ट करण्याच्या मार्गावर'; दहशतवादावर कोंकणा सेन व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:34 PM

Konkona sen sharma: कलाविश्वात दहशतवादावर एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज प्रदर्शित झाली की अनेक जण ठराविक एका धर्माला किंवा समाजाला दोष देण्यास सुरुवात करतात.

ठळक मुद्दे 'मुंबई डायरीज 26/11'च्या निमित्ताने कोंकणाने अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपली मत मांडली.

बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा सध्या तिच्या 'मुंबई डायरीज 26/11'  या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ही सीरिज असून तिला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या प्रमोशनानिमित्ताने अलिकडेच कोंकणाने धर्माविषयी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या गेल्या आहेत. "आपण सगळे धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय", असं वक्तव्य तिने 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.

कलाविश्वात कधीही दहशतवादावर एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज प्रदर्शित झाली की अनेक जण एका ठराविक धर्माला किंवा समाजाला दोष देण्यास सुरुवात करतात. त्यामुळे तुझ्या या नव्या वेबसीरिजविषयी तुला काय वाटतं? प्रेक्षकांकडून कशा स्वरुपाची प्रतिक्रिया मिळेल?असा प्रश्न कोंकणाला विचारण्यात आला. त्यावर तिने तिचं मत व्यक्त केलं आहे.

'मेरे ख्यालों की मल्लिका'! जोशमधील 'ती' अभिनेत्री सध्या काय करते माहितीये?

"ही एक अशी मानसिकता आहे ज्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. या मुद्द्यावर आपल्यालाच थोडसं जागरुकतेने वागायला हवं. दहशतवाद्यांनाही एक ठराविक धर्म असतो आणि ते कोणत्याही धर्मातून येऊ शकतात. कट्टरतावादी हाच त्यांचा धर्म असतो त्यामुळे ते नेमके कोणत्या धर्मातून येतात हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नसतं. खरं पाहायला गेलं तर आज आपण सगळेच जण धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांना एक देश म्हणून एकत्र येण्याची आणि शांत, सहिष्णुपणे एकत्र राहण्याची गरज आहे", असं वक्तव्य कोंकणाने केलं.

दरम्यान, या सीरिजच्या निमित्ताने कोंकणाने अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपली मत मांडली. कोंकणाची मुख्य भूमिका असलेल्या 'मुंबई डायरीज 26/11'  ला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे. या सीरिजमध्ये ती एका रुग्णालयातील महिला अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली आहे.  

टॅग्स :कोंकणा सेन शर्मासेलिब्रिटीवेबसीरिजबॉलिवूड