Join us  

सोशल मीडिया युजर्सनी घेतला मुकेश खन्ना यांचा क्लास, महिलांबद्दलचे वादग्रस्त विधान भोवले

By रूपाली मुधोळकर | Published: November 01, 2020 10:23 AM

युजर्सनी मुकेश खन्ना यांच्यावर जबरदस्त भडास काढली आहे. यात महिला युजर्सची संख्या जास्त आहे.

ठळक मुद्देव्हायरल व्हिडीओत मुकेश खन्ना यांनी महिलांनी घराबाहेर निघून काम करण्यावर आक्षेप जाहीर केला आहे.

महाभारतातील भीष्म पितामह आणि सुपर पॉवर बेस्ड ‘शक्तिमान’मुळे घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते मुकेश खन्ना सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. सध्या मुकेश खन्ना यांच्या एका जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुकेश खन्ना ‘मीटू’वर मत व्यक्त करत आहेत. या व्हायरल व्हिडीओत मुकेश खन्नाने महिलांनी घराबाहेर निघून काम करण्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. तूर्तास या व्हिडीओमुळे मुकेश खन्ना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत.

काय म्हणाले युजर्सयुजर्सनी मुकेश खन्ना यांच्यावर जबरदस्त भडास काढली आहे. यात महिला युजर्सची संख्या जास्त आहे. एका महिला युजरने मुकेश खन्ना यांचा चांगलाच क्लास घेतला.

‘ खरे बोललात मुकेश खन्ना की,आम्ही महिला पुरूषांच्या बरोबर नाहीत. आम्ही पुरूषांच्या बरोबरीत नाही तर त्यांच्यापेक्षा खूप उच्चस्थानी आहोत. कदाचित म्हणूनच तुमच्यासारखे पुरूष स्वत:ला असुरक्षित मानतात. महिलांबद्दल अशी मत व्यक्त करताना तुम्हाला लाज वाटायला हवी,’असे या महिला युजरने लिहिले.

अन्य एका महिला युजरनेही मुकेश खन्ना यांचा समाचार घेतला. ‘काय बकवास गोष्टी करतो हा माणूस. आजच्या जगात प्रत्येक पुरूष महिलेला तिच्या सॅलरीबद्दल वा तिच्या उत्पन्नाबद्दल विचारतो. स्वत:च्या मानसिकतेला आणि विचारांना दोष द्यायला हवा, महिलांना नाही,’असे या महिलेने लिहिले आहे.

शक्तिमान तर मुळात किलविश निघाला, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिली आहे.  अनेक लोकांनी मुकेश खन्नाच्या सर्व मालिका बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले मुकेश खन्ना

व्हायरल व्हिडीओत मुकेश खन्ना यांनी महिलांनी घराबाहेर निघून काम करण्यावर आक्षेप जाहीर केला आहे.  ‘महिलांचे घराबाहेर पडणे  हेच समस्येचे मूळ आहे.  ही मी टू ची समस्या सुरू तेव्हा झाली जेव्हा महिलांनी घराबाहेर निघून काम सुरू केले. त्यांना आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची इच्छा आहे. पण यात सर्वात जास्त समस्या त्या मुलाची होते ज्याला आपल्या आईपासून दूर रहावे लागते. त्याला आयासोबत रहावे लागते आणि तिच्यासोबत बसून ‘सांस भी कभी बहू थी’ सारख्या मालिका बघतो. पुरूष पुरूष आहे आणि महिला महिला,’असे मुकेश खन्ना व्हिडीओत म्हणत आहेत.

 MeToo वर मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त विधान, 'महिलांचं बाहेर निघून काम करणं समस्येचं मूळ'

- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना

टॅग्स :मुकेश खन्ना