Join us  

एमटीव्ही फेम रघुरामने मंगेतर नतालीसोबत बांधली लग्नगाठ! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 10:43 AM

होय, एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुरामने गर्लफ्रेन्ड नताली डि लुसियोसोबत लग्नगाठ बांधली.

ठळक मुद्देयाचवर्षी रघुरामने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यानंतर रघुराम इतक्या लवक दुसरे लग्न करणार, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण घटस्फोटानंतर काही महिन्यांतच रघुरामने त्याचे व नतालीचे नाते जगजाहिर केले. यानंतर नतालीसोबत साखरपुडा केला.

बॉलिवूड  आणि टीव्ही इंडस्ट्रीत सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. या हंगामात अनेक स्टार्सनी लग्नगाठ बांधली. दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, श्वेता बसू प्रसाद, कपिल शर्मा या सेलिब्रिटीनंतर एमटीव्ही फेम रघुराम हाही लग्नबंधनात अडकला आहे. होय, एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुरामने गर्लफ्रेन्ड नताली डि लुसियोसोबत लग्नगाठ बांधली.

गोव्यात एका पारंपरिक सोहळ्यात रघुराम व नतालीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. हे रघुरामचे दुसरे लग्न आहे.

याचवर्षी रघुरामने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यानंतर रघुराम इतक्या लवक दुसरे लग्न करणार, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण घटस्फोटानंतर काही महिन्यांतच रघुरामने त्याचे व नतालीचे नाते जगजाहिर केले. यानंतर नतालीसोबत साखरपुडा केला.

काही दिवसांपूर्वी आपण डिसेंबर महिन्यात नतालीसोबत लग्न करणार असल्याची बातमी रघुरामने सोशल मीडियावर शेअर केली होती. अर्थात त्याने लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवली होती.  

२०१६ मध्ये नताली डि लुसियो आणि रघु ‘आंखो ही आंखो में’ या गाण्यानिमित्त एकत्र आलेत आणि पुढे एकमेकांत गुंतले. यानंतर रघुने पत्नी सुगंधासोबत घटस्फोट घेतला आणि  नेटलीसोबतचे नाते जगजाहिर केले.

काही वर्षाआधी तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा मी मला परत मिळालो. तुझ्यासोबत मी प्रेम अनुभवले, आनंद अनुभवला. तू माझ्या आयुष्यात आशा बनून आलीस. आय लव्ह यू...,  अशी एक अतिशय भावूक पोस्ट रघुने लिहिली होती.   नेटलीने  इंग्लिश विंग्लिश, चेन्नई एक्सप्रेस, लेडीज वर्सेस रिकी बहल अशा अनेक चित्रपटांत गाणी गायली आहेत.

टॅग्स :रघु राम