Join us  

मृणाल ठाकूर रॅपर बादशाहला करतेय डेट?, दिवाळी पार्टीतील दोघांचा फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:27 AM

मृणाल ठाकूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर बादशाह आणि शिल्पा शेट्टीसोबतच्या दिवाळी पार्टीचा एक फोटोही शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती, पण चर्चाविषयी ठरली ती अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि रॅपर बादशाह.  दोघांमधील बॉन्डिंगने लोकांचे लक्ष वेधून घेतले. मृणालने तिच्या इन्स्टा स्टोरीवर बादशाहसोबतचे फोटो शेअर केले आहेत. शिल्पाच्या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये मृणाल आणि बादशाह एकमेकांचा हात धरुन चालताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावर आता बादशाहने प्रतिक्रिया दिली आहे.

पार्टीचा एक व्हिडिओ, ज्यामध्ये मृणाल रॅपरसोबत दिसतेय. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. व्हिडिओमध्ये मृणाल आणि बादशाह शिल्पाच्या दिवाळी पार्टीतून हातात हात घालून बाहेर पडाना दिसत आहेत. Reddit वर हे शेअर करताना एका व्यक्तीने लिहिले, "मृणाल आणि बादशाह उद्या शिल्पाच्या दिवाळी पार्टीत, ते डेटिंग करत आहेत का?" इतर अनेकांनीही त्यांच्या नात्याबाबत कमेंट्स केल्या.

मृणाल ठाकूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर बादशाह आणि शिल्पा शेट्टीसोबतच्या दिवाळी पार्टीचा एक फोटोही शेअर केला आहे. कॅप्शन असे लिहिले: "दोघही आवडते." बादशाहने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवरही ते पुन्हा पोस्ट केले. व्हिडिओमध्ये मृणाल हिरव्या रंगाचा लेंहेगा परिधान केलेला  दिसत आहे. दरम्यान बादशाहने एक स्टोरी पोस्ट केली आहे. “प्रिय इंटरनेट (ट्रोल), तुम्हाला पुन्हा एकदा निराश केल्याबद्दल क्षमस्व पण तुम्ही जे विचार करत आहात ते तसे नाही.” त्याने आपल्या पोस्टमध्ये हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे. बादशाहचे पहिले लग्न जस्मिन मसिहसोबत झाले होते. 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

टॅग्स :मृणाल ठाकूरबादशहा