Join us  

'शोले' अन् श्रीरामाचं आहे खास कनेक्शन, ड्रीम गर्ल हेमा मालिनी म्हणाल्या, 'बसंती...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 4:35 PM

'शोले' (Sholay) सिनेमा आणि श्रीरामाचं कनेक्शन काय?

Ayodhya Ram Mandir: संपूर्ण देशवासियांचं लक्ष २२ जानेवारीकडे लागलं आहे. अखेर अयोध्येत श्रीरामाचं मंदिर उभारण्यात आलं असून २२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यासाठी साधुसंत महंतांपासून ते प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. 'ड्रीम गर्ल' अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) या शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'शोले' (Sholay) सिनेमा आणि श्रीरामाचं काय कनेक्शन आहे ते सांगितलं. 

1975 साली आलेल्या सुपरहिट 'शोले' सिनेमात रामगढ दाखवण्यात आले होते. नुकतंच हेमा मालिनी यांनी शोले आणि श्रीरामाचं कनेक्शन सांगितलं आहे. 'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या,'शोले आणि श्रीरामाचं कनेक्शन ते म्हणजे रामगढ. बसंती रामगढमध्ये राहायची. त्यामुळे ती श्रीरामाशी जोडलेली होती. म्हणूनच कदाचित शोले इतक्या मोठ्या प्रमाणात हिट झाला.'

कशी सुरु आहे तयारी?

हेमा मालिनी म्हणाल्या,'सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मी पहिल्यांदाच अयोध्येत आले आहे. अपेक्षेपेक्षा बरंच काही जास्त पाहायला मिळत आहे. अजून तर ४ दिवस बाकी आहेत. त्यामुळे ४ दिवसांनी प्राणप्रतिष्ठेला काय काय पाहायला मिळतं यासाठी सगळेच उत्सुक आहेत. माझीही तयारी झाी  आहे. मी कांजीवरम साडी नेसणार आहे. बाकी तर तुम्हाला त्यादिवशी कळेलच.'

टॅग्स :हेमा मालिनीअयोध्याराम मंदिर