Join us

इम्तियाजला बनवायचाय बिहारवर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 23:39 IST

दिग्दर्शक इम्तियाज अली याचा जन्म जमशेदपूर येथील असून त्याला म्हणे बिहार वर आधारित कथा चित्रपटाची निर्मिती करावयाची आहे. उत्तम ...

दिग्दर्शक इम्तियाज अली याचा जन्म जमशेदपूर येथील असून त्याला म्हणे बिहार वर आधारित कथा चित्रपटाची निर्मिती करावयाची आहे. उत्तम स्क्रिप्ट आणि विषयाच्या शोधात मी आहे असे इम्तियाज सांगतो. पुढे चित्रपटाचा प्रवास सांगताना तो म्हणतो,‘ आयुष्याचा प्रवास खुप अनुभव देत असतो. चित्रपटासाठीच्या कथा या आयुष्यातूनच मिळत असतात. पाटणा हे माझ्या आजीचे घर आहे. तिथे मी जवळपास आठ वर्षे राहिलो होतो. मला जेव्हा बिहारवर काही विषय सुचेल तसा मी चित्रपट काढणार आहे. पाटणा फिल्म फेस्टिव्हल मध्ये एका सेशनदरम्यान बोलताना ‘जब वी मेट’ फेम दिग्दर्शक म्हणाला,‘ माझा प्रवास हा अतिशय वाईट विद्यार्थी ते चांगला विद्यार्थी असा झाला आहे. बिहारच्या प्रादेशिक भाषेत मला चित्रपट साकारायचा आहे. हा चित्रपट भावनेवर आधारित असेल. मला या जागेविषयी फार प्रेम, आपुलकी आहे.’