Join us  

​‘या’ चित्रपटाने निर्माण केले बॉलिवूडमध्ये दोन नवे ‘शत्रू’?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2017 2:06 PM

‘जॉली एलएलबी2’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दोन नवे शत्रू निर्माण केले, असेच म्हणायला हवे. होय, आता अर्शद वारसी विरूद्ध अक्षय ...

‘जॉली एलएलबी2’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दोन नवे शत्रू निर्माण केले, असेच म्हणायला हवे. होय, आता अर्शद वारसी विरूद्ध अक्षय कुमार असे नवे ‘वॉर’ बॉलिवूडमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. ‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसी लीड रोलमध्ये होता, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याच चित्रपटाच्या सीक्वलमध्ये मात्र अर्शद जाऊन अक्षय आला. अर्शद अद्यापही ही गोष्ट पचवू शकलेला नाही.  कदाचित अर्शद याच गोष्टीचा सूड घेऊ पाहत आहे. विश्वास बसत नाहीय? पण हे खरे आहे. अक्षयचा ‘जॉली एलएलबी2’रिलीज होतोय, नेमक्या त्याच दिवशी अर्शदचा ‘इरादा’ रिलीज होतोय. म्हणजे, अर्शदने अक्षयला जशात तसे उत्तर द्यायचे ठरवलेय.दिग्दर्शक अपर्णा सिंग यांचा ‘इरादा’ हा पहिला डेब्यू सिनेमा. अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शाह यात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारीला रिलीज होतोय. याचदिवशी ‘जॉली एलएलबी2’ चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘इरादा’च्या निर्मात्यांना याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, आमचा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. फेबु्रवारीत तो रिलीज होतोय. ‘रईस’ आणि ‘काबील’ हे दोन सिनेमे जानेवारीतच रिलीज होत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत आमच्या चित्रपटाला कुणी मोठा स्पर्धक नाही. राहिली गोष्ट अक्षयची तर तो आमच्यासाठी ‘धोका’ नाहीच. एकंदर काय तर अक्षय विरूद्ध अर्शद असा मुकाबला बॉक्सआॅफिसवर रंगणार, हेच एकप्रकारे ‘इरादा’च्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.‘जॉली एलएलबी’ हा सन २०१३ मध्ये आलेला चित्रपट हिट राहिला. याच्या सीक्वलमध्ये आपणच असणार, अशी अर्शदला खात्री होती. पण तीन वर्षानंतर ‘जॉली एलएलबी’चा सीक्वल आला आणि अर्शदचा पत्ताही कट झाला. आता याचा ‘सूड’ उगवण्यात अर्शदचा ‘इरादा’ किती यशस्वी ठरतो, ते बघूयात!