Join us  

“मास्क नाकावर देखील लाव” मौनी रॉय होते ट्रोल, लॉकडाऊनमध्ये केली मोठी चुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:26 AM

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे.

लॉकडाऊनमध्ये मौनी रॉयने प्रवास केला, इतकेच नाही तर मास्क लावणे बंधनकार असले तरी तो नाकावर लावलेला नाही. प्रोटेक्शन म्हणून फेस शिल्डही लावले आहे. पण मास्क कसा वापराव हे देखील मौनीला माहिती नसल्यामुळे जबरदस्त ट्रोल होत आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मौनी दुबईमध्ये अडकून पडली होती. सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर भारतात परतत असल्याची माहिती दिली होती. आपल्या घरी परतल्याचा आनंद तिच्या चेह-यावर दिसत असला तरी नेटीझन्स तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळते आहे. व्हिडीओवर तिच्या चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया देखील येत आहे.

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. तिनं अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहता. हॉटनेसच्या बाबतीत मौनी रॉय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते.

मौनी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तिचे काही डान्स व्हिडिओसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात.

टॅग्स :मौनी राॅय