Join us

Mother's Day : ...या मॉम्स सेलिब्रेट करीत आहेत पहिलाच ‘मदर्स डे’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 14:30 IST

‘आई’ या जीवनदायी शब्दाची जादू प्रत्येक बालकाच्या मनावर तो जन्माला आल्यापासून तर त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेहमीच असते. ‘आ’ म्हणजे ...

‘आई’ या जीवनदायी शब्दाची जादू प्रत्येक बालकाच्या मनावर तो जन्माला आल्यापासून तर त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेहमीच असते. ‘आ’ म्हणजे ‘आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’. म्हणजेच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन  ज्या ठिकाणी होते, तो महासंगम म्हणजे ‘आई’. खरं तर ‘आई’ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अनमोल क्षण समजला जातो. गरीब असो वा श्रीमंत, सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य प्रत्येकाच्याच जीवनात ‘आई’चे प्रचंड महात्म्य आहे. आज ‘मदर्स डे’निमित्त बॉलिवूडमधील काही तारका हा दिवस साजरा करीत आहेत. पहिलाच मदर्स डे साजरा करीत असल्याने त्यांच्यासाठी हा दिवस स्पेशल असून, त्याविषयी घेतलेला हा आढावा...करिना कपूरसद्यस्थितीत बॉलिवूडमधील सर्वाधिक हॉट आणि हॅपनिंग मम्मी म्हणून करिना कपूरकडे बघितले जाते. करिनाने तिच्या संपूर्ण प्रेग्नेंसीदरम्यान स्वत:ला कधीच मीडियापासून दूर ठेवले नाही. ती नेहमीच फॅशन शोज आणि मॅग्जीनच्या फोटोसाठी बेबी बंप दाखविताना दिसली. यावेळी ‘आई’ होण्याचा आनंदही तिच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत होता. करिनाने याच वर्षी जानेवारीमध्ये तैमूर नावाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती तिच्या आयुष्यातील पहिलाच मदर्स डे सेलिब्रेट करीत असून, आम्हाला खात्री आहे की, हा दिवस ती तिच्यासारख्याच स्टायलिश पद्धतीने सेलिब्रट करेल. मीरा राजपूतखरं तर मीरा राजपूत सेलिब्रिटी नाही आहे, परंतु ज्या दिवशी तिचे नाव अभिनेता शाहिद कपूर याच्याशी जोडले गेले तेव्हापासून ती सेलिब्रिटीप्रमाणे नेहमीच चर्चेत असते. हे दाम्पत्य नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाले होते. याठिकाणी मीराचा जलवा बघण्यासारखा होता. हे दाम्पत्य गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पॅरेंट्स बनले. या दोघांच्या जीवनात मीशा नावाची एक गोंडस मुलगी आली असून, आपल्या मम्मी-पप्पाप्रमाणे मीशाही सेलिब्रिटी बनली आहे. कारण तिची एक झलक बघण्यासाठी चाहते अक्षरश: आतूर असतात. मीरा आपल्या चिमुकल्या मीशाबरोबर पहिला ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करीत आहे. गीता बसराएकेकाळी बॉलिवूडचा भाग असलेली गीता बसरा गेल्या कित्येक काळापासून पडद्यावरून गायब आहे. परंतु जेव्हा तिने क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्याशी विवाह केला तेव्हापासून पुन्हा एकदा ती लाइमलाइटमध्ये आली आहे. गीताचे लग्न २०१५ मध्ये पार पडले. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या आयुष्यात ‘हिनाया’ नावाच्या एका परीचे आगमन झाले. गीता आपल्या चिमुकली हिनायाबरोबर पहिला मदर्स डे सेलिब्रेट करीत असून, तिच्यासाठी तो खूपच स्पेशल आहे. राणी मुखर्जी अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या पर्सनल लाइफवरून खूपच पझेसिव्ह आहे. कारण तिने कधीच तिचे पर्सनल आयुष्य तिच्या फॅन्सबरोबर शेअर केले नाही. मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिने पहिल्यांदाच फॅन्ससाठी आपली चिमुकली ‘आदिरा’ हिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावर्षी राणी आदिरासोबत दुसरा मदर्स डे सेलिब्रेट करीत असली तरी तिच्या चाहत्यांना याच वर्षी आदिराची झलक बघावयास मिळाल्याने त्यांच्यादृष्टीने राणी पहिलाच मदर्स डे सेलिब्रेट करीत आहे. अर्पिता खान शर्मासलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा मुलगा आहिल आतापासूनच सेलिब्रेटी बनला आहे. मामा सलमान खानचा सर्वात लाडका भाचा म्हणून ओळखल्या जाणाºया आहिलचे फोटोज् नेहमीच सोशल मीडियावर शेअर केले जातात. सलमानने तर त्याच्या बर्थ डेचा केकही आहिलला सोबत घेऊन कापला होता. अर्पितादेखील आहिलबरोबर दुसरा मदर्स डे सेलिब्रेट करीत असून, तिच्यादृष्टीने तो खूपच स्पेशल आहे.