‘मॉम’नंतर ‘मिस्टर इंडिया2’मध्ये दिसणार श्रीदेवी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 15:57 IST
८० च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री श्रीदेवी हिचा जलवा आजही कायम आहे. सध्या श्रीदेवी ‘मॉम’ या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ...
‘मॉम’नंतर ‘मिस्टर इंडिया2’मध्ये दिसणार श्रीदेवी!
८० च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री श्रीदेवी हिचा जलवा आजही कायम आहे. सध्या श्रीदेवी ‘मॉम’ या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. श्रीदेवी सन २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश‘मध्ये अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली होती. आता श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ बनणार आहे. अलीकडे ‘मॉम’चा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमाचा ट्रेलर पाहून एक चांगली कलाकृती पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी आशा प्रेक्षकांना आहे. एकंदर काय तर श्रीदेवीच नाही तर ‘मॉम’ या चित्रपटाचा निर्माता असलेला श्रीदेवीचा पती बोनी कपूर हाही सध्या जाम खूश आहे. त्यात आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, ‘मॉम’ पाठोपाठ आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा दुसरा प्रोजेक्ट घेऊन येण्यास बोनी सज्ज आहे आणि तेही आपल्या घरच्याच कलाकारांना घेऊन. होय, ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल म्हणजेच ‘मिस्टर इंडिया2’ या सिनेमावर बोनीने काम सुरु केले आहे. ‘मिस्टर इंडिया’मध्ये श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. ‘मिस्टर इंडिया2’मध्ये श्रीदेवी व अनिल कपूर ही जोडी दिसणार आहे. याशिवाय आणखी एक जोडी यात दिसेल, असे कळतेय. ‘मिस्टर इंडिया’ची कथा जिथे संपली तिथून ‘मिस्टर इंडिया2’ची कथा सुरु होणार आहे. अर्थात या कथेवर सध्या काम सुरु आहे. ‘मिस्टर इंडिया’ सिनेमाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले होते. पण दुसºया भागाचे दिग्दर्शन ते करणार नाहीत हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘मिस्टर इंडिया2’ साठी राकेश ओमप्रकाश मेहरा किंवा ‘मॉम’ सिनेमाचे दिग्दर्शक रवी उद्यावर यांची नावे चर्चेत आहेत.