Join us  

तर ही तुमची मोठी चूक...! केंद्राच्या ‘त्या’ दाव्यावर भडकली अभिनेत्री रिचा चड्ढा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 1:20 PM

केंद्राच्या दाव्यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट करत, तिनं आपला संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यावर सध्या टीकेची झोड उठत आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. अशा एकाही घटनेची नोंद नाही, अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली. केंद्राच्या या दाव्याचे राजकीय पडसाद उमटणे सुरू झाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या दाव्यावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता केंद्राच्या या दाव्यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा ( Richa Chaddha ) हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट करत, तिनं आपला संताप व्यक्त केला.

काय केलं ट्विट?

केंद्र सरकारच्या दाव्यानुसार, कोव्हिड 19 च्या दुस-या लाटेत राज्य व केंद्र शासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झालेला नाही, अशा आशयाचं ट्विटट पीटीआयनं केलं होतं. हे ट्विट रिट्विट करत रिचानं सरकारच्या या दाव्यावर संताप व्यक्त केला. ‘असं म्हणणं मोठी चूक आहे. ऑक्सिजनअभावी आपल्या आप्तांना गमावणा-यांची तुम्ही खिल्ली उडवत आहात. मोठी चूक व एक घृणास्पद असत्य,’अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय आहे केंद्राचा दावासंसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यावर सध्या टीकेची झोड उठत आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव गेलाय का ? असा प्रश्न काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अशी कुठलीही नोंद नसल्याचं सांगितले. आरोग्य राज्यांचा विषय आहे. मृतांचा अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य मंत्रालयाला देत असतात. राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.  त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला.  

टॅग्स :रिचा चड्डा