मनसेने थांबविले ‘फोर्स २’ चे शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 19:41 IST
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ‘फोर्स चित्रपटाचे शूटिंग बंद पाडले. वर्क परमिट नसताना परदेशी कलाकार चित्रपट करीत असल्याने शूटिंग थांबविले. मनसेच्या ...
मनसेने थांबविले ‘फोर्स २’ चे शूटिंग
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ‘फोर्स चित्रपटाचे शूटिंग बंद पाडले. वर्क परमिट नसताना परदेशी कलाकार चित्रपट करीत असल्याने शूटिंग थांबविले. मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ३५ परदेशी कलाकारांनाही ताब्यात घेतलं आहे. गोरेगावच्या ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजात ‘फोर्स २’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं. संबंधित कलाकारांकडे टुरिस्ट व्हिसाही नसल्याने उघड झालं आहे. त्यानंतर या कलाकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संबंधीत देशाच्या दुतावासाशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येईल. मनसेने चित्रपटाचं शूटिंग बंद पाडलं, त्यावेळी चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता जॉन अब्राहमही सेटवर हजर होता. विपूल शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे.