Join us  

राज ठाकरेंनी आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पत्नीसह एन्ट्री घेतली अन्...; आमिरच्या लेकीच्या लग्नातील व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 9:50 AM

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात राज ठाकरेंचा मराठमोळा लूक, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. आयराने नुकतंच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज केल्यानंतर नुपूर आणि आयराने १० जानेवारीला उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर आयरा आणि नुपूरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार पडलं. त्यांच्या रिसेप्शनला सिनेजगतातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आमिरच्या लेकीच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह आयरा-नुपूरच्या रिसेप्शनसाठी उपस्थित होते. या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयराच्या लग्नाच्या या रिसेप्शन पार्टीसाठी राज ठाकरे मराठमोळ्या अंदाज दिसून आले. सदरा, पायजमा आणि मफलर घेऊन त्यांनी रिसेप्शन सोहळ्यात एन्ट्री घेतली. तर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनीही डिझायनर साडी परिधान करत मराठमोळा लूक केला होता. त्यांच्या साधेपणाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'विरल भय्यानी' या इन्स्टाग्राम पेजवरुन राज ठाकरेंचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

आमिरचा जावई नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह तो आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर राहिलेला आहे. आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेइरा खानआमिर खान