Join us  

OMG! मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर दाखल करण्यात आला होता बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 6:59 PM

महाअक्षय चक्रवर्ती याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यावेळी काहीच दिवसानंतर त्याचे लग्न होते.

ठळक मुद्देबलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास सक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हिंदी आणि भोजपूरी चित्रपटातील एका अभिनेत्रीने हे आरोप केले होते.

‘डिस्को डान्सर’ म्हणून बॉलिवूड प्रेमींमध्ये ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे. महाअक्षयचे नाव मिमोह देखील असून त्याने चित्रपटसृष्टीत एंट्री करण्यासाठी त्याचे नाव बदलले. त्याने चित्रपटसृष्टीत येण्यासाठी कित्येक किलो वजन कमी केले होते. जिम्मी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत आला होता. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास सक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हिंदी आणि भोजपूरी चित्रपटातील एका अभिनेत्रीने हे आरोप केले होते. लग्नाचे आमिष दाखवून महाअक्षयने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा या अभिनेत्रीने केला होता. 

महाअक्षय चक्रवर्ती याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यावेळी काहीच दिवसानंतर त्याचे लग्न होते. दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मा यांचा विवाह होणार होता. लग्नाला उणेपुरे पाच दिवस उरले असताना महाअक्षयवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या सगळ्यामुळे त्याच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. पण हे प्रकरण शांत झाल्यानंतर मदालसा आणि त्याने काहीच दिवसांत लग्न केले. 

२००८मध्ये ‘जिम्मी’ या चित्रपटातून महाअक्षयने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर महाअक्षयचे आणखी चार चित्रपट आलेत. पण तेही आपटले. तर मदालसा एक अभिनेत्री आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ, जर्मन, पंजाबी अशा अनेक भाषिक चित्रपटांत तिने काम केले आहे. मदालसा लहानपणापासूनच अभिनेत्री बनू इच्छित होती. याला कारणही होते. कारण मदालसाचे आई-वडील हे बॉलिवूड इंडस्ट्रीशी जुळलेले होते. मदालसाच्या पित्याचे नाव सुभाष शर्मा आहे. सुभाष शर्मा एक नामवंत दिग्दर्शक आहेत. मदालसाची आई शीला शर्मा सुद्धा अभिनेत्री आहे . ‘नदिया के पार’, ‘यस बॉस’, ‘घातक’, ‘हम साथ साथ है’ यासारख्या हिट चित्रपटात शीला शर्मा यांनी काम केले आहे. १९९८ मध्ये आलेल्या बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत शीला देवकीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती