Join us  

मिथुन चक्रवर्तीची पूर्वपत्नी हेलेनाने बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर आता करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 5:16 PM

मिथुन चक्रवर्तीचे लग्न अभिनेत्री योगिता बालीसोबत झाले आहे. पण हे मिथुनचे दुसरे लग्न आहे. मिथुनचे पहिले लग्न हेलेना ल्युकसोबत झाले होते.

ठळक मुद्देहेलेनाने इंडस्ट्री सोडली आणि थेट ती परदेशात निघून गेली. गेल्या काही वर्षांपासून ती न्यूयॉर्कमध्ये असून ती फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करतेय. 

मिथुन चक्रवर्तीला डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाते. मिथुनने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले होते. सुरक्षा, वारदात, डान्स डान्स, अग्निपथ यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. त्याने बंगाली, हिंदी, ओडिसा, भोजपूरी, तमीळ, तेलगु, कन्नड, पंजाबी यांसारख्या अनेक भाषांमध्ये काम केले आहे.

मिथुन चक्रवर्तीचे लग्न अभिनेत्री योगिता बालीसोबत झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे मिथुनचे दुसरे लग्न आहे. मिथुनचे पहिले लग्न हेलेना ल्युकसोबत झाले होते. सत्तरीच्या दशकात फॅशन जगतात तिचा दबदबा होता. हेलेना मिथुनच्या आयुष्यात येण्याआधी मिथुनचे अभिनेत्री सारिकासोबत अफेअर असल्याच्या चर्चा मीडियात गाजत होत्या. पण हेलेनाला पाहाताच मिथुन तिच्या प्रेमात पडला आणि त्यांनी 1979 मध्ये लग्न केले. पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

हेलेना ही देखील एक अभिनेत्री होती. तिने जुदाई या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने तीन चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये अपयश मिळाले. त्यानंतर तिने इंडस्ट्री सोडली आणि थेट ती परदेशात निघून गेली. गेल्या काही वर्षांपासून ती न्यूयॉर्कमध्ये असून ती फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करतेय. 

मिथुनचा जन्म कोलकातामध्ये झाला होता. मिथुनकडे आज करोडो रुपये असले तरी त्याच्याकडे एकेकाळी जेवायला देखील पैसे नसायचे. त्याला लहानपणापासून डान्सची आवड होती आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करून तो पैसे मिळवत असे. डान्ससोबत त्याला अभिनयाचीही आवड होती. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला. पण मुंबईत आल्यावर त्याच्याकडे खाण्यासाठी देखील पैसे नव्हते. सुरुवातीच्या काळात मिथुनने अनेक चित्रपटात ज्युनिअर कलाकार म्हणून काम केलं. त्या काळात मिथुनची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यानंतर त्याला 'मृगया' या सिनेमात मोठी संधी मिळाली. या सिनेमातील त्याच्या कामासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतरही त्याचा स्ट्रगल कमी नाही झाला. 1982 मध्ये मिथुनच्या 'डिस्को डान्सर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि तेव्हापासून इंडस्ट्रीला एक डिस्को डान्सर मिळाला. खऱ्या अर्थाने या सिनेमामुळे मिथुन लोकप्रिय झाला होता. 

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती