Join us  

अभियक्षेत्रात येण्यापूर्वी हा प्रसिद्ध अभिनेता होता नक्षलवादी, जेवणासाठी देखील नसायचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:57 PM

या अभिनेत्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले असून त्याच्या अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

ठळक मुद्देमिथुन चित्रपटात येण्यापूर्वी एक नक्षलवादी होता. पण त्याच्या भावाचे अचानक निधन झाल्यानंतर त्याला त्याच्या घरी परत यावे लागले.

मिथुन चक्रवर्तीला डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाते. मिथुनने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले होते. सुरक्षा, वारदात, डान्स डान्स, अग्निपथ यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. त्याने बंगाली, हिंदी, ओडिसा, भोजपूरी, तमीळ, तेलगु, कन्नड, पंजाबी यांसारख्या अनेक भाषांमध्ये काम केले आहे.

मिथुन अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी नक्षलवादी होता असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का. पण हे खरे आहे. मिथुन चित्रपटात येण्यापूर्वी एक नक्षलवादी होता. पण त्याच्या भावाचे अचानक निधन झाल्यानंतर त्याला त्याच्या घरी परत यावे लागले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबियांची जबाबदारी ही त्याच्यावरच होती. 

मिथुनचा जन्म कोलकातामध्ये झाला होता. मिथुनकडे आज करोडो रुपये असले तरी त्याच्याकडे एकेकाळी जेवायला देखील पैसे नसायचे. त्याला लहानपणापासून डान्सची आवड होती आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करून तो पैसे मिळवत असे. डान्ससोबत त्याला अभिनयाचीही आवड होती. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला. पण मुंबईत आल्यावर त्याच्याकडे खाण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्या काळात हेलन यांच्या नृत्यावर सगळे फिदा होते. त्यामुळे त्याने हेलनचे असिस्टंट बनण्याचे ठरवले आणि त्याला कोणी ओळखू नये यासाठी त्याचे नाव बदलून राना रेज ठेवले. त्यानंतर मिथुनने अनेक चित्रपटात ज्युनिअर कलाकार म्हणून काम केलं. त्या काळात मिथुनची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यानंतर त्याला 'मृगया' या सिनेमात मोठी संधी मिळाली. या सिनेमातील त्याच्या कामासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतरही त्याचा स्ट्रगल कमी नाही झाला. 

1982 मध्ये मिथुनच्या 'डिस्को डान्सर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि तेव्हापासून इंडस्ट्रीला एक डिस्को डान्सर मिळाला. खऱ्या अर्थाने या सिनेमामुळे मिथुन लोकप्रिय झाला होता. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. मिथुन हा अभिनेता असण्यासोबतच हॉटेल बिझनेसमध्येही आहे. उटी आणि मसूरीमध्ये त्याचे काही हॉटेल्स आहेत. 

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती