Join us  

 निधन झाले मिष्टी मुखर्जीचे, लोकांनी श्रद्धांजली वाहिली मिष्टी चक्रवर्तीला!!

By रूपाली मुधोळकर | Published: October 05, 2020 11:00 AM

मिष्टी चक्रवर्ती म्हणाली, मी जिवंत आहे...

ठळक मुद्दे बंगाली सिनेसृष्टीत मिष्टी चक्रवर्ती हे एक मोठे नाव आहे 2014 साली ‘पोरिचोई’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.

बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे  वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले. पण लोकांनी श्रद्धांजली वाहिली ती अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीला. सोशल मीडियावर मिष्टी चक्रवर्तीच्या निधनाची चर्चा अशी काही पसरली की स्वत: तिला समोर येत, मी अद्याप जिवंत आहे, हे सांगावे लागले.झाले असे की, शुक्रवारी संध्याकाळी मिष्टी मुखर्जीचे निधन झाले. पण सोशल मीडियावर मिष्टी मुखर्जीऐवजी मिष्टी चक्रवर्तीच्या निधनाचे वृत्त पसरले. मग काय, चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहणे सुरु केले. हे मॅसेज मिष्टी चक्रवर्तीपर्यंत पोहोचले आणि तिला धक्काच बसला. यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आपण जिवंत असून ठणठणीत असल्याचे सांगितले.

एका फेक मॅसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत तिने लिहिले, ‘काही मीडिया रिपोर्टनुसार, माझे आज निधन झाले. परंतु परमेश्वराच्या कृपेने मी जिवंत आहे आणि अगदी ठणठणीत आहे. मला खूप पुढे जायचे आहे मित्रांनो,’ असे मिष्टी चक्रवर्तीने लिहिले.

मिष्टी चक्रवर्तीचा चेहरा तुम्ही विको टर्मरिक क्रिमच्या जाहिरातीत बघितला असेल. बंगाली सिनेसृष्टीत मिष्टी चक्रवर्ती हे एक मोठे नाव आहे 2014 साली ‘पोरिचोई’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता. यानंतर सुभाष घई यांच्या ‘कांची- द अनब्रेकेबल’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते. याशिवाय ग्रेट ग्रँड मस्ती, बेगम जान, मणिकर्णिका यासारख्या बॉलिवूड सिनेमांतही तिने काम केलेय. काही तेलगू, तामिळ व मल्याळम सिनेमांतही ती झळकली आहे.

मिष्टी मुखर्जीचे झाले निधन

शुक्रवारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे निधन झाले. ती दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. काही महिन्यांपासून ती किटो डाएटवर होती. शुक्रवारी संध्याकाळी बेंगळुरू येथे तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्यामागे आईवडील व एक भाऊ आहे.  2013 साली ‘मैं कृष्णा हूं’ या मालिकेतून मिष्टीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘मैं कृष्णा हूं’मध्ये डान्स नंबर केल्यानंतर ती दिग्दर्शक राकेश मेहता यांच्या ‘लाईफ की तो लग गई’ या सिनेमात झळकली. मिष्टीने अनेक आयटम नंबर्समध्ये काम केले. अनेक मोठ्या पार्ट्या व इव्हेंटमध्ये ती दिसायची. अनेक बंगाली सिनेमांतही तिने काम केले. 2014 मध्ये ती एका मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीमध्ये अडकली होती. ती सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या गंभीर आरोप लागल्यामुळे ती मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळी पोलिसांनी मिष्टीच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक अश्लील सीडी आणि साहित्य जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिच्या वडील व भावाला अटकही झाली होती. यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.  

अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे निधन, वयाच्य 27 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

माझे सीन्स कुठे आहेत? कंगना राणौतवर भडकली ‘मणिकर्णिका’ची अभिनेत्री

टॅग्स :बॉलिवूड