Join us  

#MeToo मोहीम म्हणजे मूर्खपणा; इंडस्ट्रीत सर्व सहमतीनं होतं- शिल्पा शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 4:54 PM

बिग बॉस सीझन 10ची विजेती शिल्पा शिंदेंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीमध्ये बलात्कारासारख्या घटना होत नसतात. जे काही घडते ते दोन व्यक्तींच्या मर्जीने असते.

ठळक मुद्देशिल्पाने सुद्धा 'भाभी जी घर पर है'चा निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता''#MeToo सारखी मोहिमे म्हणजे निवळ मूर्खपणा आहे''

मीटू मोहिमेमुळे बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. एक गट या घटनांना वाचा फोडण्याऱ्या महिलेंच्या मागे उभा राहिला आहे तर दुसरा या मोहिमेवर टीका करणार. बिग बॉस सीझन 10ची विजेती शिल्पा शिंदेंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीमध्ये बलात्कारासारख्या घटना होत नसतात. जे काही घडते ते दोन व्यक्तींच्या मर्जीने असते.  मीटू सारखी मोहिमे म्हणजे निवळ मूर्खपणा आहे. 

 मीडियाला दिलेल्या इंटरव्हु्य दरम्यान शिल्पा म्हणाली, ''ज्यावेळी गोष्टी घडतात तुम्हाला तेव्हाच त्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे नंतर बोलून त्याचा काहीच उपयोग नसतो. मला सुद्धा याचा धडा मिळाला आहे. जेव्हा गोष्टी तुमच्या सोबत घडतात तेव्हाच बोला. नंतर बोलून फक्त कॉन्ट्रोव्हर्सी होते बाकी हाती काही लागत नाही.''  शिल्पाने सुद्धा 'भाभी जी घर पर है'चा निर्माता संजय कोहलीवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. 

 हॉलिवूडमध्ये सुरु झालेल्या मीटू मोहिमे अंतर्गत तनुश्रीने नाना पाटेकर पाटेकर यांच्यावर आरोप केले. यानंतर अनेक महिल्यांनी आपल्यावर झालेल्या अन्ययाविरोधात वाचा फोडली. आतापर्यंत कैलाश खेरपासून साजिद खानपर्यंत बी-टाऊनमधील अनेक जाणांवर आरोप लावण्यात आले आहेत. साजिद खानवर लावलेल्या आरोपांवरमुळे अक्षय कुमारने 'हाऊसफुल 4' या सिनेमाचे शूटिंग थांबवण्याची विनंती निर्मात्यांना केली होती. यानंतर साजिद खानने स्वत:च या सिनेमाचे दिग्दर्शन सोडत असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.   

टॅग्स :मीटूशिल्पा शिंदे