Join us  

शेखर सुमन यांचा उपरोधिक सवाल; काय ‘मीटू’ मोहिम संपली? काय क्रांती संपली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:19 AM

#MeToo मोहिमेअंतर्गत काही पुरूषांनीही आपल्या ‘मीटू’ स्टोरी जगाला सांगितल्या. यातलेच एक नाव म्हणजे, कंगना राणौतचा एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमन. आता अध्ययनच्या बाजूने त्याचे वडिल व अभिनेते शेखर सुमन मैदानात उतरले आहेत.

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेला तोंड फुटले. लैंगिक गैरतर्वनाच्या शिकार ठरलेल्या अनेक महिलांनी जगाचा पर्वा न करता आपल्या ‘मीटू’ स्टोरी शेअर केल्यात. अनेक दिग्गजांवर गैरतर्वनाचे आरोप लावलेत. केवळ महिलाचं नाहीत तर काही पुरूषांनीही या मोहिमेअंतर्गत आपल्या ‘मीटू’ स्टोरी जगाला सांगितल्या. यातलेच एक नाव म्हणजे, कंगना राणौतचा एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमन. अध्ययनने आपली आपबीती सांगताना कंगनाचा अनेक आरोप केले होते. आता अध्ययनच्या बाजूने त्याचे वडिल व अभिनेते शेखर सुमन मैदानात उतरले आहेत. होय, शेखर सुमन यांनी ‘मीटू’ मोहिमेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘अध्ययनने आपली ‘मीटू’स्टोरी शेअर केली तेव्हा, तो हे सगळे पब्लिसिटीसाठी करतोय, असे म्हटले गेले. पण आता या सगळ्या महिला स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर करत आहेत, मग तेही पब्लिसिटीसाठी आहे का?’,असा सवाल शेखर सुमन यांनी केला.

केवळ इतकेच नाही तर काहीशा थंड पडलेल्या ‘मीटू’ मोहिमेवरही त्यांनी उपरोधिक ताशेरेओढले आहेत. काय ‘मीटू’ आंदोलन संपले? आरोप-प्रत्यारोप संपलेत? वाद संपलेत? हेडलाईन्स कमी झाल्यात? महिलांची क्रांती संपली? चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात...खोदा पहाड निकला चुहा...असे टिष्ट्वट त्यांनी केले.शेखर सुमर यांनी ज्या टिष्ट्वटर हँडलवरून हे टिष्ट्वट केले, ते व्हेरिफाईड नाही आहे. पण हे टिष्ट्वटर हँडल शेखर सुमनचेच असल्याचा दावा केला जात आहेअध्ययनने आठवडाभरापूर्वी टिष्ट्वटरवरचं आपली मीटू स्टोरी सांगितली होती. ‘आज सगळे आपआपली स्टोरी सांगत आहेत. दोन वर्षांपूर्वी मी माझी स्टोरी सांगितली त्यावेळी सगळ्यांनी माझी खिल्ली उडवली होती. माझ्यावर फ्लॉप चा शिक्का मारून हिणवण्यात आले होते. माझ्या आई-वडिलांनाही राष्ट्रीय टीव्ही चॅनेल्सवर बरंच ऐकून घ्यावं लागलं होत.. मात्र आता ‘मीटू’मुळे पीडितांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची संधी मिळत आहे. कंगणा राणौतने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, शिवीगाळ केली होती आणि इतकंच नाही तर सँडल फेकून मारली होती,’असे अध्ययन म्हणाला होता.

टॅग्स :शेखर सुमनमीटूकंगना राणौत